मुंबई । असे म्हणतात की, जगात कुठे ना कुठे आपल्यासारखा हुबेहूब दिसणारा माणूस सापडतोच. हुबेहूब भारतीय क्रिकेट खेळाडूंसारखे दिसणारेसुद्धा काही जण आहेत ज्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सचिन आणि विराट कोहली सारखे दिसणारे लोक अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येतात. आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासारखा दिसणारा ही एक मुलगा समोर आला आहे. त्या मुलाला पाहताच हैदराबादमधले लोक गोंधळून जातात.
बुमराह सारखा दिसणार्या या मुलाचे नाव राज मिश्रा असे आहे. लोक त्याला पाहताच बुमरा समजून त्याच्याकडे बोलण्यासाठी येतात. राज मिश्राने राष्ट्रीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तेलंगणाचे प्रतिनिधित्व केले होते.
राज मिश्रा एका वेबसाइटशी बोलताना म्हणाला की, “जेव्हा लोक मला पाहतात तेव्हा मला बुमराह म्हणून हाक मारतात. जेव्हा मी बुमराह नाही असे लोकांना कळाल्यावर ते माफी मागून पुढे जातात. 2019 साली राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मी पाचव्या स्थानावर होता. कोरोना व्हायरसमुळे मला अडचणी येत आहेत. पण तरीही मी सराव करणे सोडले नाही.”
कोहलीसारखा हुबेहूब दिसणाऱ्या खेळाडूंचे नाव प्रिन्स वडोनिया आहे. त्याची स्टाईल कोहलीसारखीच आहे. 2016 साली प्रिन्स पहिल्यांदा स्टेडियमवर आला तर सारे जण त्याला पाहून हैराण झाले. आपल्यासारखा हुबेहूब दिसणारा माणूस पाहून कोहली देखील चकीत झाला. कपिलदेव यांनीही प्रिन्स यांची भेट घेतली होती.