Loading...

आशियाई टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धेत भारताच्या देव जावीया याचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

मुलींच्या गटातील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात     

पुणे: एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत  मुलांच्या  गटात भारताच्या देव जावीयाने तर मुलींच्या गटात उझबेकीस्तानच्या  यास्मीन करीमजानोवा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  केला. तर एकेरीत मुलींच्या गटातील सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान आज उप-उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत  उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात देव जावीयाने थायलंडच्या आठव्या मानांकित सुकसुमराम टीचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-4असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.

भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने जपानच्या तायो हिरानोचे आव्हान 6-1, 6-2असे सहज मोडीत काढले.  पाचव्या मानांकित मेघ भार्गव पटेलने कडवी झुंज देत हाँगकाँगच्या की लुंग एनजीचा 6-2, 3-6, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

भारताच्या सातव्या मानांकित मन शाहने दिग्विजय प्रताप सिंगचा टायब्रेकमध्ये 7-6(5) 6-4असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. अव्वल मानांकित कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलतावने क्वालिफायर भारताच्या क्रिश पटेलचा 6-2, 6-2असा पराभव करून आगेकूच केली.

मुलींच्या गटात एकेरीत उझबेकीस्तान यास्मीन करीमजानोवाने जपानच्या दुसऱ्या मानांकित हिमरी सातोचा 6-3 6-4असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. थायलंडच्या आठव्या मानांकित थायलंडच्या मई नपात निरुदोर्न हिने भारताच्या मल्लिका मराठेवर 3-6 6-0 6-3असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

Loading...

तिसऱ्या मानांकित थायलंडच्या मनचया सवांगकिइने चीनच्या जियाकी हुंगला 6-0 6-4असे नमविले. अव्वल मानांकित हाँग काँगच्या वांग हाँग यी कोडीने कडवा प्रतिकार करत थायलंडच्या पुनिन कोवापीतुकतेडचा 6-3 3-6 6-1असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीगाठली.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत ,मुलांच्या गटात सिध्दांत बांठीयाने मेघ भार्गव पटेलच्या साथीत नथ्यूत एन व सेबॅस्टियन नोटाफ्ट यांचा 7-5 7-6(7)असा पराभव केला. देव जावीया व मन शहा या जोडीने केविन पटेल व आर्यन झवेरीयांचा टायब्रेकमध्ये 6-4 7-6(2)असा पराभव केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उप-उपांत्यपूर्व फेरी: मुले:

Loading...

डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान)(1)वि.वि क्रिश पटेल(भारत)6-2, 6-2

सिध्दांत बांठीया(भारत)(4) वि.वि.तायो हिरानो(जपान)6-1, 6-2

सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(2)वि.वि.नथ्यूत एन(थायलंड)6-3, 6-2

मेघ भार्गव पटेल(भारत)(5)वि.वि. की लुंग एनजी(हाँगकाँग)6-2, 3-6, 6-1

सच्चीत शर्मा(भारत)वि.वि साई कार्तिक रेड्डी गंटा(भारत) 6-0, 6-4

देव जावीया(भारत)वि.वि. सुकसुमराम टी(थायलंड)(8)7-6(4), 6-4

Loading...

मन शाह(भारत)(7)वि.वि दिग्विजय प्रताप सिंग(भारत)7-6(5) 6-4

सीओन याँग हन(कोरिया)(3)वि.वि.अथर्व निमा(भारत)6-4 6-1

मुली:

वांग हाँग यी कोडी(हाँग काँग)(1)वि.वि.पुनिन कोवापीतुकतेड(थायलंड) 6-3 3-6 6-1

प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)(4)वि.वि साकी इमामुरा(जपान) 6-3 6-3

जियाकी वांग(चीन)(7) वि.वि प्रियांशी भंडारी(भारत) 6-0 6-1

मई नपात निरुदोर्न(थायलंड)(8) वि.वि मल्लिका मराठे(भारत) 3-6 6-0 6-3

मनचया सवांगकिइ(थायलंड)(3)वि.वि जियाकी हुंग( चीन) 6-0 6-4

Loading...

यास्मीन करीमजानोवा(उझबेकीस्तान)वि.वि हिमरी सातो(जपान)(2)6-3 6-4

मना कावामुरा(जपान)(5)वि.वि सेव्हील युलदाशिव(उझबेकिस्तान)7-6(6) 6-2

फुना कोझाकी(जपान)(6) वि.वि. याकतेरिना दिमित्रीचेंको(कझाकस्तान) 4-6 6-3 6-2

दुहेरी गट-उपांत्यपूर्व फेरी: मुले

सिध्दांत बांठीया(भारत)/मेघ भार्गव पटेल(भारत)(1) वि.वि नथ्यूत एन(थायलंड/ सेबॅस्टियन नोटाफ्ट(हाँगकाँग)7-5 7-6(7)

क्रिस्टीन डीडीयर चिन(मलेशीया)/ सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(3) वि.वि. ओ डेडा मुहम्मद ए रझ्झा(इंडोनेशिया)/कबिर हंस(भारत) 6-1 6-1

देव जावीया(भारत)/मन शहा(भारत) वि.वि केविन पटेल(भारत)/आर्यन झवेरी(भारत) 6-4 7-6(2)

सीओन याँग हन(कोरिया)/ सुकसुमराम टी(थायलंड)(2)वि.वि साई कार्तिक रेड्डी गंटा(भारत)/माधवीन कामत(भारत)  4-6 6-2 [12-10]

दुहेरी गट मुली-

हिमारी सातो(जपान)/मनचया सवांगकिइ(थायलंड)वि.वि. याकतेरिना दिमित्रीचेंको(कझाकस्तान)/ यास्मीन करीमजानोवा(उझबेकीस्तान) 6-2, 6-4;

प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)/ जियाकी वांग(चीन)(4) वि.वि जियाकी हुंग(चीन)/ वांग होई की जेनी  6-2, 6-2;

मना कावामुरा(जपान)/फुना कोझाकी(जपान)वि.वि.काव्या सेव्हेनी(भारत)/सेव्हील युलदाशिव(उझबेकिस्तान)6-3, 6-4;

साकी इमामुरा(जपान)/पुन्नीन कोवापिटुकटेड(थायलंड)वि.वि. मई नपात निरुदोर्न(थायलंड)/ वांग हाँग यी कोडी(हाँग काँग)(2)6-2, 6-1

You might also like
Loading...