पुणे, 14 फेब्रुवारी 2023 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने नवव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत साखळी फेरीत जेट्स, ऑल स्टार्स, किंग्ज व वॉरियर्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला.
पुना क्लब क्रिकेट (Pune Club Premier Cricket League 2023) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रकाश कारिया (40धावा व 2-2). याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने अर्थ गोरिलाज संघाचा 40धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात अधिश शहाच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर किंग्ज संघाने व्हीएस टायगर्स संघाचा सर्व 8 गडी राखून पराभव केला. शरण सिंगच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर जेट्स संघाने सेलर्स संघाचा सर्व 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. शरण सिंगने केवळ 4 धावा देत 3 गडी बाद करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.
अन्य लढतीत अरुण खट्टरच्या अष्टपैलू कामगिरीसह वॉरिअर्स संघाने अर्थ गोरिलाज संघाचा 4 धावांनी तर किरण देशमुखच्या दमदार खेळीसह माव्हरिक्स संघाने टायफून्स संघाचा सर्व 8 गडी राखून पराभव सलग दुसरा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
ऑल स्टार्स: 6षटकात 1बाद 80धावा(प्रकाश कारीया 40(19,5×4,2×6), खालिद परवानी नाबाद 32(18,3×4,1×6), अर्जुन मोटाडो 1-11)वि.वि.अर्थ गोरिलाज: 6षटकात 5बाद 40धावा(संदीप अभिचंदानी 13, प्रकाश कारीया 2-2, प्रोमित सुद 1-8); सामनावीर – प्रकाश कारीया; ऑल स्टार्स संघ 40धावांनी विजयी;
सेलर्स: 6 षटकात 7बाद 21 धावा (अश्विन लोखंडे 5, शरण सिंग 3-4, राहुल गुप्ता 2-2, ऋषभ बजाज 2-1) पराभुत वि. जेट्स: 2.1षटकात बिनबाद 23 धावा (चिराग लुल्ला नाबाद 17, पुनीत सामंत नाबाद 5);
सामनावीर – शरण सिंग; जेट्स संघ 8गडी राखून विजयी;
व्हीएस टायगर्स: 6 षटकात 4 बाद 68 धावा(तारिक परवानी नाबाद 42(20, 3×4,3×6), झियान ताबल 9, अधिश शहा 1-5, रोहित जाधव 1-9) पराभूत वि किंग्ज: 5.2 षटकात बिनबाद 72 धावा(अधिश शहा नाबाद 41(20, 5×4), भारत शहा नाबाद 28(15, 4×4))
सामनावीर- अधिश शहा; किंग्ज संघ 8 गडी राखून विजयी.
वॉरियर्स: 6 षटकात 3 बाद 73 धावा(अरुण खट्टर 47(20, 1×4, 5×6), आर्यमान पिल्ले नाबाद 20(13, 4×4), रोहित शर्मा 2-12) वि.वि अर्थ गोरिलाज: 6 षटकात 4 बाद 69 धावा(आर्यन गाडगीळ 28(13, 3×4,1×6), अर्जुन मोटादू 18(11,1×4,1×6),अरुण खट्टर 1-11); सामनावीर- अरुण खट्टर; वॉरिअर्स संघ 4 धावांनी विजयी.
टायफून्स: 6 षटकात 4 बाद 47 धावा (क्रिश शहा नाबाद 18(14, 2×4), अश्विन शहा 11, राहिल 1-6, चिराग परमार 1-8, किरण देशमुख 1-9, विजय सामनंत 1-9) पराभूत वि माव्हरिक्स: 3 षटकात बिनबाद 48 धावा (रौनक ढोलेपाटील नाबाद 25(10, 1×4, 2×6), किरण देशमुख नाबाद 20(10, 4×4); सामनावीर- किरण देशमुख; माव्हरिक्स संघ 8 गडी राखून विजयी. (Jets, All Stars, Kings, Warriors Win in 9th Pune Club Premier Cricket League 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगभरात कोट्यवधी चाहते असणारा शाहरुख बनला विराट-जडेजाचा फॅन; म्हणाला, ‘मलाही शिकायचंय…’
भारताच्या पोरी चमकल्या! टी20 रँकिंगमध्ये जेमिमा अन् ऋचाला मोठा फायदा, तर स्म्रीती टॉप-3मध्ये कायम