पुणे, दि. २६ ऑगस्ट २०२३ – पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित पूना क्लब फिटनेस लीग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसअखेर जेट्स संघाने एकूण ६१ गुणांची कमाई करताना अ आणि ब या दोन्ही गटांमध्ये आघाडीचे स्थान मिळविले. पूना क्लबच्या १७५ सभासदांनी दोन गटांमधील एकूण १० संघांचे प्रतिनिधित्व करताना या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
अॅथलाईट स्पोर्टस अॅकॅडमी व इलिसियम क्लब, फ्लोअर वर्क्स, रूबी हॉल क्लिनिक, सोलब्युल आणि सुराणा ट्रेडर्स यांनीप्रायोजित केलेल्या या स्पर्धेत मस्क्युलर स्ट्रेंग्थ आणि मस्क्युलर एन्ड्युरन्स अशा दोन विभागांमध्ये स्पर्धा आहे.
जेट्स संघाने मस्क्युलर स्ट्रेंग्थमध्ये ३१ गुण, तर मस्क्युलर एन्ड्युरन्समध्ये ३० अशा ६१ गुणांची कमाई करताना दोन्ही विभागांमध्ये मिळून आघाडीचे स्थान पटकावले. जेट्स संघानंतर स्पेशल २७ संघाने ५५ गुणांसह दुसऱ्या, तर एस्टेटली एजंट्स संघ ५४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकाची निश्चिती केली आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे एसके बॉडी टोनर्स (५२ गुण), परमार ऑल स्टार्स (४५ गुण), किंग्ज (४४ गुण), मिशन इम्पॉसिबल संघ (४४ गुण), तसेच आयोग वेलनेस संघ ३७ गुणांसह त्यानंतरच्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आशियाई क्रीडा स्पर्धेकरीता महाराष्ट्राच्या २ पुरुष आणि २ महिला खेळाडूंना भारतीय कबड्डी संघात संधी
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश