भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेत शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. या विजयासोबत भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान न्यूझीलंडचा एकही फलंदाज समाधानकारक खेळी करू शकला नाही. त्याचा अष्टपैलू जिमी निशम आश्चर्यकार प्रकारे बाद झाला. तसेच फलंदाजी करताना त्याची बॅट देखील तुटली.
जिमी निशम या सामन्यात न्यूझीलंडसाठी काही खास खेळी करू शकला नाही. तो सामन्यादरम्यान धावा करण्यासाठी झगडत असल्याचे पाहायला मिळाले. निशम भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. न्यूझीलंडच्या डावाच्या १८ व्या षटाकत भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी आला होता.
भुवनेश्वरच्या या षटकातील पहिल्या चार चेंडूत अवघ्या २ धावा निघाल्या होत्या आणि याच कारणास्तव निशम चिंतेत होता. त्यानंतर अपेक्षित धावा करण्यासाठी त्याने पुढच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागला आणि त्याची बॅट तुटली. बॅटचा तुटलेला तुकडा भुवनेश्वरच्या डोक्यावरून जाऊन मैदावार पडला. त्यानंतर षटकाच्या पुढच्याच चेंडूवर भुवनेश्वरने निशमची विकेट घेतली. रिषभ पंतने निशमचा झेल घेतला.
https://twitter.com/Sunainagosh7/status/1461717961685671939
दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकासानावर १५३ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य १७.२ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतासाठी सलामीवीर रोहित शर्मा (५५) आणि केएल राहुलने (६५) सर्वाधिक धावा केल्या. तसेच संघाचा वगेवान वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडसाठी ग्लने फिलिप्सने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तसेच सलामीवीर मार्टिन गप्टिलने आणि डॅरील मिशेल यांनी प्रत्येकी ३१ धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार टिम साउदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि त्याच्याव्यतिरिक्त न्यूझीलंडचा कोणताच गोलंदाज एकही विकेट घेऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
रांची टी२० सामन्यांतून मोहम्मद सिराजला का केले प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर? बीसीसीआयने सांगितले कारण
भारताकडून दुसऱ्या टी२०त न्यूझीलंड चारीमुंड्या चीत, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार