आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना भविष्यात भारतीय संघात संधी मिळणार असल्याचे बीसीसीआयच्या काही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 मालिकेत यातील बरेच खेळाडू खेळताना दिसतील. अद्याप या संघाची घोषणा झाली नसली तरी भविष्याच्या दृष्टीने या मालिकेत त्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याचे सांगितले जातेय. आयपीएलच्या या हंगामात आपल्या जबरदस्त फटकेबाजीने पंजाब किंग्सच्या अनेक विजयात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या जितेश शर्मा याने नुकतेच एका मुलाखतीत एक मोठे वक्तव्य केले.
जितेश याची वेस्ट इंडीज दौऱ्यावर निवड होण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक तसेच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला एक वेगाने धावा काढण्याचे कौशल्य त्याच्यात आहे. या सर्व शक्यता असताना त्याने एका मुलाखतीत म्हटले,
“भारतीय संघात संधी मिळाली तर तो एक अभिमानाचा क्षण असेल. यापूर्वी मी भारतीय संघाचा भाग राहिलो आहे. संघातील वातावरण अत्यंत मैत्रीपूर्ण असते.”
याच मुलाखतीत त्याने युवा फलंदाज रिंकू सिंग याचे देखील कौतुक केले. तो म्हणाला,
“रिंकू अत्यंत गुणवान खेळाडू आहे. मी अपेक्षा करतो की, भविष्यात आम्ही भारतीय संघासाठी काही सामने संपवू शकतो.”
जितेश शर्मा याने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 156 पेक्षा जास्तच्या सरासरीने 309 धावा केल्या होत्या. त्याने अनेक सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचे देखील कामगिरी करून दाखवली. दुसरीकडे, रिंकू सिंग याने या संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. केकेआरसाठी खेळताना त्याने फिनिशर म्हणून भूमिका बजावताना एकहाती सामने जिंकून दिले. गुजरातविरुद्ध सलग 5 षटकार मारत त्याने संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
(Jitesh Sharma Said Me And Rinku Will Finish Matches For India)
महत्वाच्या बातम्या –
नेदरलँड्सच्या विश्वचषक 2023 साठी आशा कामय! विक्रमजीत सिंगच्या शतकामुळे ओमान 74 धावांनी पराभूत
‘हा’ दिग्गज बनणार भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक! बांगलादेश दौऱ्याआधी स्वीकारणार जबाबदारी