लंडन। भारताविरुद्ध लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात शनिवारी (14 जुलै) इंग्लंडचा प्रतिभावंत फलंदाज जो रुटने शानदार शतक साजरे केले.
त्याने डावाच्या 48 व्या षटकात त्याचे वनडेतील 12 वे शतक 109 चेंडूत पूर्ण केले. याबरोबरच रुटने एक खास विक्रम केला आहे. त्याने इंग्लंडकडून वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या मार्कस ट्रेस्कोथिकच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
मागील काही सामन्यात लवकर बाद झालेला रुट या सामन्यात सलामीवीर जॉनी बेअरस्टो बाद झाल्यावर 11 व्या षटकात तिसऱ्या क्रमांकार खेळायला आला होता.
त्यानंतर त्याने कर्णधार इयान मॉर्गन बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागिदारी करत इंग्लंडचा डावही सांभाळला. मॉर्गननेही अर्धशतक करताना 51 चेंडूत 53 धावा केल्या. तसेच मॉर्गन बाद झाल्यावर रुटने डेविड विलीला साथीला घेत 7 व्या विकेटसाठी 83 धावांची भागिदारी रचली.
मात्र डावाच्या शेवटच्या चेंडूवर रुट 116 चेंडूत 113 धावांवर धावबाद झाला. त्याला एमएस धोनीने धावबाद केले. विलीनेही आक्रमक खेळताना 31 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली.
यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 322 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी 323 धावांचे आव्हान असेल.
या सामन्यात भारताकडून कुलदिप यादवने 3 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: भारत-इंग्लंड चालू सामन्यातच त्याने प्रेयसीला घातली लग्नाची मागणी
–भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी