---Advertisement---

विश्वचषक 2023 पूर्वी आर्चरने बदलली आपल्या गोलंदाजीची ऍक्शन, पहा व्हिडीओ

Jofra Archer
---Advertisement---

विश्वचषक 2023 या वर्षी भारतात होणार आहे. विश्वचषक काही दिवसांवर आला आसून याच पार्शभूमीवर सर्व क्रिकेट संघ सज्ज झाले आहेत. अशातच काही संघानी विश्वचषकाशाठी आपला संभावित संघ घोषित केला आहे.  इंग्लडने देखिल आपला संघ जाहिर केला. इंग्लंडच्या संघात बरेच दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यात जोफ्रा आर्चर सारख्या वेगवान गोलंदाजाचे नाव सामिल आहे. विश्वचशकासाठी त्याची निवड झाली नसल्याने इंग्लंड क्रिकेट संघाचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

इंग्लंडमध्ये झालेला 2019 चा विश्वचषक इंग्लंड संघाने आपल्या नावावर केला. या दरम्यान जोफ्रा आर्चर (Jofra Archer) इंग्लंड संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. आर्चर आगामी विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून भारतात येणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरच्या जागी गस ऍटकिन्सनचा संघात समावेश केला आहे जो आर्चरसारखी गोलंदाजी करतो. दरम्यान आर्चर हा मेगा इव्हेंट सुरू होण्यापूर्वी दुखापतीतून सावरण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

सध्या आर्चरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो नेटमध्ये डाव्या हाताने गोलंदाजी करताना दिसत आहे. परंतु आर्चर उजव्या हातचा गोलंदाज आहे. यादरम्यान तो अचूक लाईनमध्ये चेंडू टाकत आहे.

https://twitter.com/rajgeetacricket/status/1692861925145641133?s=20

आर्चरने त्याच्या कोपराच्या दुखापतीमुळे अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिका गमावल्या आहेत. तो शेवटचा आयपीयल 2023 मध्ये खेळताना दिसला होता. मात्र, त्यातही आर्चर दुखापतीमुळे संपूर्ण सामना खेळू शकला नाही आणि तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. आर्चर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेतही संघाचा भाग नसणार आहे.

जोफ्रा आर्चरची आतंरराष्ट्रीय कारकीर्द
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चरने 22 वनडे सामन्यात 42 विकेट घेतल्या आहेत. 15 टी20 सामन्यात 18 विकेट त्याने बळकावल्या आहे. तसेच 13 कसोटी सामन्यांच्या 24 डावांमध्ये 42 विकेट त्याने आपल्या नावावर केल्या आहेत. (jofra archer change his bowling style)

महत्वाच्या बातम्या-
बुमराहच्या नावावर मोठा विक्रम, खास यादीत तिसरा क्रमांक मिळवण्यासाठी हार्दिक पंड्याला टाकले मागे
राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023मध्ये अभिमन्यु पुराणिक, सेतुरामन एसपी, दिप सेनगुप्ता, मित्रभा गुहा संयुक्तरीत्या आघाडीवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---