भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली होती. यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने अनपेक्षित विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे हाच फॉर्म कायम राखत ते शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) सुरु होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
मात्र या सामन्याआधी त्यांच्यासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत ही बातमी जाहीर केली.
We can confirm that @JofraArcher will miss the second Test against India in Chennai starting on Saturday after having an injection in his right elbow.
— England Cricket (@englandcricket) February 11, 2021
पहिल्या सामन्यात झाली होती दुखापत
जोफ्रा आर्चरला पहिल्याच कसोटी सामन्यात उजव्या हाताच्या कोपराला वेदना होत होत्या. त्या वेदनेत वाढ झाल्याने त्याला इंजेक्शन घ्यावे लागले आहे. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसेल, अशी इंग्लंड संघ व्यवस्थापनाला आशा आहे. दरम्यान आर्चरच्या जागी दुसऱ्या सामन्यात अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडचा समावेश केला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या:
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता