टी20 विश्वचषक 2022मध्ये वेस्ट इंडिज संघाला पहिल्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना विजय मिळवणे खूपच महत्त्वाचे होते. त्यांचा दुसरा सामना बुधवारी (दि. 19 ऑक्टोबर) झिम्बाब्वेविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 31 धावांनी विजय मिळवला. मात्र, वेस्ट इंडिजच्या डावादरम्यान एक मजेशीर घटना पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना जॉनसन चार्ल्स आणि रोवमन पॉवेल याच्याशी संबंधित आहे.
धावताना आपटला जॉनसन चार्ल्स
या सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज जॉनसन चार्ल्स (Johnson Charles) चांगली फलंदाजी करत होता. त्याने 36 चेंडूत 45 धावांची दमदार खेळी केली. मात्र, यानंतर तो धावबाद होऊन तंबूत परतला. झालं असं की, ही घटना 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. यादरम्यान चार्ल्स धाव घेण्याच्या प्रयत्नात धपकन मैदानावर आपटला.
रोवमन पॉवेलने केली होती चूक
या घटनेदरम्यान चार्ल्ससोबत रोवमन पॉवेल फलंदाजी करत होता. स्ट्रायकर एंडवर पॉवेल होता. त्याने शॉट खेळून धाव घेण्यासाठी क्रीझच्या बाहेर पाऊल ठेवले. यावेळी त्याला क्रीझच्या बाहेर पडताना पाहून चार्ल्सही धावला. मात्र, यावेळी क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू पाहून रोवमन पॉवेल याने धाव घेण्यास नकार दिला. या सर्वांमध्ये चार्ल्सला त्याची विकेट गमावत आली, दुसरीकडे हे सर्व पाहून पॉवेलची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. पॉवेलने त्याच्या सहकाऱ्यावर भडकल्याचे दिसला आणि त्याने चार्ल्सला रागानेही पाहिले.
— Bleh (@rishabh2209420) October 19, 2022
वेस्ट इंडिज संघ टी20 विश्वचषकाच्या ब गटात सामील आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजला विजय मिळवणे खूप महत्त्वाचे होते. कारण, त्यांना पहिल्या सामन्यात स्कॉटलंटविरुद्ध 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. जर त्यांना झिम्बाब्वेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असता, तर त्यांना सुपर 12 फेरीपूर्वीच त्यांच्या देशात परतावे लागले असते. मात्र, त्यांनी झिम्बाब्वेला 31 धावांनी पराभूत करत आव्हान कायम राखले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जमलंय बघा! विराट कोहलीने केली ‘पुष्पा’मधील सुपरहिट ऍक्शन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर