चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ९ वा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज जॉनी बेअरस्टोकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. दरम्यान, त्याच्या एका षटकारामुळे चक्क संघाच्या डगआऊटमधील फ्रिजची काचही फुटली.
या सामन्यात मुंबईने हैदराबादला १५१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी एका बाजूने बेअरस्टोने पॉवरप्लेमध्ये जोरदार आक्रमण केले.
त्याने त्याच्या खेळीदरम्यानचा पहिला षटकार ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर डावाच्या तिसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर मारला. त्याने मारलेला हा फटका इतका जोरदार होता की तो चेंडू फ्रिजला लागला आणि फ्रिजच्या काचा फुटल्या. विशेष म्हणजे या षटकात बेअरस्टोने ३ चौकार आणि १ षटकारासह तब्बल १८ धावा चोपल्या.
https://twitter.com/iAnkitaker/status/1383457798764171267
Bairstow????????#IPL2021 pic.twitter.com/yhznZdciJu
— Gandhi Kannan (@gandhi_offcl) April 17, 2021
https://twitter.com/peachworld26/status/1383462275030216711
अखेर बेअरस्टोचे वादळ त्याच्या स्वत:च्या चूकीनेच थांबले. ८ व्या षटकात कृणाल पंड्याच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात त्याचा पाय स्टंपला लागला आणि स्टंपवरील बेल्स पडल्या. त्यामुळे बेअरस्टोला २२ चेंडूत ४३ धावांवर आपली विकेट गमवावी लागली. या खेळीत बेअरस्टोने ४ षटकार आणि ३ चौकार मारले.
Just Bairstow saab breaking his own things today. #SRHvsMI pic.twitter.com/NareSbQ6io
— Manya (@CSKian716) April 17, 2021
मुंबईच्या १५० धावा
मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १५० धावा केल्या. मुंबईकडून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉकने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तसेच किरॉन पोलार्डने नाबाद ३५ आणि कर्णधार रोहित शर्माने ३२ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला १५० धावांचा टप्पा पार करता आला.
हैदराबादकडून मुजीब उर रेहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर खलील अहमदने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! पोलार्डने मारला तब्बल १०५ मीटरचा षटकार, पाहा व्हिडिओ
‘सिक्सर किंग’ रोहित! आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी
विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधाराचे कुटुंबीय कोरोनाबाधित, रेमडीसिवरसाठी मागितली मदत