जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगातील वेगवेगळ्या क्रिकेट संघातील खेळाडू सहभागी होतात आणि कमाल प्रदर्शनाच्या जोरावर मोठ-मोठ्या विक्रमांची आपल्या नावावर नोंद करतात. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील २०व्या सामन्यातही एका विक्रमांची नोंद झाली.
मंगळवारी (६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हा सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकात १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचे खेळाडू १८.१ षटकात सर्वबाद होत केवळ १३६ धावाच करु शकले. त्यामुळे मुंबईने ५७ धावांनी सामना जिंकला आणि हंगामातील सलग तिसरा सामना जिंकला.
दरम्यान इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने राजस्थानकडून खेळताना एक नवा विक्रम केला. त्याने सलामीला फलंदाजीला येत ४४ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. हे बटलरचे आयपीएल कारकिर्दीतील १०वे अर्धशतक होते. यासह हा धुरंधर आयपीएलमध्ये १० अर्धशतके करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
बटलरपुर्वी केविन पीटरसन (५ अर्धशतके), जॉनी बेयरस्टो (५ अर्धशतके), इयॉन मॉर्गन (४ अर्धशतके) आणि ओविस शहा (४ अर्धशतके) या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनीही आयपीएलमध्ये अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच आहे सिक्सर किंग! बेंगलोरलाही टाकलंय मागे
रैनाला संधी मिळाली नाही, परंतू त्याने घडवलेला क्रिकेटर मात्र गाजवतोय आयपीएल
बापरे! ८६ आयपीएल सामने खेळलेल्या स्मिथच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
ट्रेंडिंग लेख-
सुपर-डुपर गोलंदाज-यष्टीरक्षक जोडी! आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ अनोखा विक्रम, वाचा सविस्तर
असे ५ खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीला आणि ८ व्या क्रमांकावर केली आहे फलंदाजी
संघाला चॅम्पियन बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा, तरीही राहिले दुर्लक्षित; पाहा आयपीएलमधील अभागी खेळाडू