ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या पुरूष संघांच्या आठव्या टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup)अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्ने पराभव केला. या विजयानंतर जेव्हा इंग्लंडचा संघ चषक घेऊन फोटो काढण्यासाठी पोज देत होता, त्याआधी खेळाडूंनी सेलिब्रेशन केले. ज्यामध्ये चषक कर्णधार जोस बटलर याच्या हातात होता आणि त्याच्या बाजूला मोईन अली, आदिल रशिद बसले होते. त्यानंतर बटलरने जे केले, त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इंग्लंडचे खेळाडू शॅम्पेनसोबत जल्लोष करणार हे जेव्हा जोस बटलर (Jos Buttler) याला कळाले त्याचक्षणी त्याने आदिल रशिद (Adil Rashid) आणि मोईन अली (Moeen Ali) यांना तेथून जाण्यास सांगितले. इस्लाममध्ये दारू निषिद्ध आहे आहे, हे सर्वानाच माहित आहे. याचमुळे बटलरने रशिद आणि मोईन यांना आधीच सतर्क केले. त्यानंतर ते दोघेही पोडियममध्ये गेले.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी (13 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. फलंदाजी करण्यास उतरलेल्या पाकिस्तानला इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगलाच त्रास दिला. सॅम करन याने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट्स, रशिदने 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्स याने एक आणि ख्रिस जॉर्डन यानेही दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून शान मसूद (Shan Masood) यानेच सर्वाधिक धावा केल्या. त्याने केलेल्या 38 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावसंख्या उभारली.
Respect for religious diversity is an essential element of any peaceful society.
Here England captain Jos Buttler asked Adil Rashid and Moeen Ali to leave before they celebrated with champagne. Respect.#ENGvsPAK #T20WorldCup22 #T20WorldCupFinal pic.twitter.com/Tu9pvqKZba
— Mohd Shahnawaz Hussain (@Mohd_S_Hussain) November 13, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना ऍलेक्स हेल्स एक धाव करत बाद झाला. त्यानंतर मात्र बटलरने 17 चेंडूत 26 धावा करत धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुन्हा एकदा स्टोक्स संघाच्या मदतीला धावला. त्याने 49 चेंडूत नाबाद 52 धावा करत विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावली. त्याचबरोबर मोईनने 13 चेंडूंत 3 चौकाराच्या सहाय्याने 19 धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खान आणि हॅरीस रौफ अधिक इकॉनॉमी रेटच्यानुसार अधिक यशस्वी ठरले. रौफने 4 षटकात 23 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. Jos Buttler before the celebration alerted Adil Rashid & Moeen Ali for This
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: सामना ऑस्ट्रेलियात, राडा पंजाबमध्ये! इंग्लंड-पाकिस्तान सामन्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये दगडफेक
जाफर रॉक्स! धोनीच्या डायलॉगचा वापर करत केला पाकिस्तानचा अपमान, चाहते झाले लोटपोट