विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. संघाचा कर्णधार जोस बटलरने याबाबत निराशा व्यक्त केली आहे. जोस बटलर म्हणाला की, आम्ही मोठ्या अपेक्षा घेऊन भारतात आलो होतो, पण आमची कामगिरी तशी झाली नाही. बटलरच्या म्हणण्यानुसार, या सामन्यात फलंदाजी थोडी चांगली होती पण तरीही आम्ही सामना गमावला.
विश्वचषक 2023च्या 36व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडचा 33 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सलग पाचवा विजय नोंदवला त्यामुळे उपांत्य फेरीतील त्यांचा रस्ता आता जवळपास निश्चित झाला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकांत सर्वबाद 286 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावाच करू शकला. इंग्लंडचा 7 सामन्यांमधला हा सहावा पराभव आहे आणि आता त्यांना पहिल्या 8 मध्ये राहणेही खूप कठीण दिसत आहे. सुरुवातीचे काही सामने ऑस्ट्रेलियासाठी चांगले नव्हते परंतु आता त्यांनी पुनरागमन करत सलग पाच सामने जिंकले आहेत.
संघाच्या या पराभवाबाबत जोस बटलर (Jos Buttler) याने मोठे वक्तव्य केले आहे. सामन्यानंतर तो म्हणाला, “या पराभवामुळे आम्ही नक्कीच निराश झालो आहोत. आज फलंदाजीत बरीच सुधारणा झाली. जर तुम्ही 30 धावांनी हरलात तर कोणतीही तक्रार नसावी. कर्णधार म्हणून माझ्यासाठी हा खूप वाईट टप्पा आहे. आम्ही मोठ्या अपेक्षेने भारतात आलो पण त्यानुसार आम्ही चांगली कामगिरी केली नाही. आम्ही त्यांना छोट्या भागीदारी बनवण्याची संधी दिली. मैदानात दव होते आणि त्यामुळेच आम्हाला विजयाची खात्री होती पण आम्ही मागे राहिलो. मला फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नाही.”
विश्वचषक 2023 मधील कामगिरीमुळे इंग्लंड संघाला आता 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्राॅफीतूनही बाहेर पडण्याची वेळ आली आहे. (Jos Buttler Big Reaction After England’s Defeat Said As a captain)
म्हत्वाच्या बातम्या
विजयानंतर गगनात मावेना कमिन्सचा आनंद, पण व्यक्त केली ‘या’ गोष्टीची चिंता, म्हणाला, ‘आताही वाटतंय की…
’Syed Mushtaq Ali Trophy: SRHच्या खेळाडूने आयुष बदोनीच्या खेळीवर फेरले पाणी, रियान परागचा संघ फायनलमधून बाहेर