इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूंमध्ये राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंजाद जोस बटलर याचे नाव येते. त्याने आयपीएलच्या या १५ व्या हंगामात दरमदार कामगिरी केली आहे. त्याने ७ सामन्यांतच आत्तापर्यंत ३ शतके आणि २ अर्धशतके ठोकली आहे. नुकताच त्याने राजस्थान रॉयल्स संघातील त्याचा सहकारी आर अश्विनबरोबर चर्चा केली. यावेळी त्याने जर तो क्रिकेटपटू नसता तर कोण झाला असता, याबद्दल खुलासा केला आहे.
राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अश्विन (R Ashwin) आणि बटलर (Jos Buttler) रॅपिड फायर खेळत आहेत, म्हणजेत एकमेकांना काही प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेत आहेत. यात दिसते की अश्विनने बटलरला एक प्रश्न विचारला की, ‘जर तू क्रिकेटपटू नसता, तर काय झाला असता?’
त्यावर उत्तर देताना बटलर म्हणाला, ‘मी नेहमीच म्हणतो, एक पोस्टमन. हे माझे यासाठी उत्तर आहे.’ बटलर पुढे याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हणाला, ‘त्यामुळे मी पत्र सकाळी दिली असती आणि मग मी दुपारनंतर गोल्फ खेळायला गेलो असतो.’
अश्विनने पुढे त्याला विचारले, ‘मग गोल्फर. हे चांगले आहे ना?.’ यावर पुढे बटलर म्हणाला, ‘वाह! एक खराब गोल्फर. पण माझ्याकडे एक चांगला जॉब असला असता. मला पत्र पोहचवायला आवडले असते, पण मला वाटते आता ती फॅशन जुनी झाली आहे.’
Ash to Jos: What's your first impression of me?
All of us: ????????This is a conversation you don't want to miss! ????#MeeshoForTheRoyalsShopping | #RoyalsShopAtMeesho | #RoyalsFamily | @Meesho_Official | @ashwinravi99 | @josbuttler pic.twitter.com/sBNdKd3I22
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 24, 2022
बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये ८१.८३ च्या सरासरीने ४९१ धावा केल्या आहेत. बटलर हा क्रिकेटमधील इंग्लंडचा एक उत्तम खेळाडू मानला जातो. त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. तो इंग्लंडचा मर्यादीत षटकांच्या संघाचा उपकर्णधार असून २०१९ सालच्या विश्वविजेत्या संघाचा भागही होता. तसेच २०२१ टी२० विश्वचषकात तो इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
कोणासी सांगावे कळेना! ‘माझे अर्धे पैसे दंड भरण्यातच जातात’, सामना विजयानंतर केएल राहुलचे गाऱ्हाणे
‘पंत म्हणजे यष्टीमागील दुसरा धोनी!’, कुलदीपने कारण सांगत गायले गुणगान
Video: स्म्रीती मंधानाला नाही पटला रनआऊटचा नवा नियम, बाद झाल्यानंतर विरोधी संघाशी घातला वाद