वनडे मालिकेत ३-० ने पराभूत केल्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे.या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान संघाने जिंकला होताय तर दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघावर ४५ धावांनी विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली होती. या सामन्यात इंग्लंड संघाचा विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याने एक आकर्षक शॉट खेळला होता, जे पाहून सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जोस बटलर हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच तो अनेकदा आगळे वेगळे शॉट खेळताना दिसून आला आहे. अशातच पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने एक आकर्षक शॉट खेळला आहे.
बटलरचा आकर्षक शॉट
तर झाले असे की, इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना ५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद हसनैन गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथा चेंडू हसनैनने १४४ किमी प्रति तासाच्या वेगाने फेकला होता. या चेंडूवर बटलरने ऑफ साईडच्या दिशेने बाहेर येऊन गतीचा उपयोग करत यष्टिरक्षकाच्या वरून स्कुप शॉट खेळत षटकार लगावला. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Jos Buttler scoops 144 kmph delivery for six over keepers head watch video)
It's just so beautiful ????
Scorecard/clips: https://t.co/QjGshV4LMM
???????????????????????????? #ENGvPAK ???????? pic.twitter.com/8W8R1sNmTv
— England Cricket (@englandcricket) July 18, 2021
इंग्लंड संघाचा जोरदार विजय
दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात २०० धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये जोस बटलरने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली होती. तर लिविंगस्टोनने ३८ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला ९ गडी बाद अवघ्या १५५ धावा करण्यात यश आले होते. हा सामना इंग्लंड संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला. तसेच ही मालिका १-१ ने बरोबरीत आली आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी-२० सामना मंगळवारी (२० जुलै) खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लक्षवेधी पदार्पण! १९ वर्षीय खेळाडूचा प्रतिस्पर्धींना चोप, २०२ च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा
वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार