fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

बापरे! फक्त २ भारतीय खेळाडूंना घेऊन ‘या’ दिग्गजाने तयार केली ‘आयपीएल ऑलटाईम ११’

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने त्याचा ऑलटाइम आयपीएल संघ निवडला आहे. त्याच्या या संघात आश्चर्य चकीत करणारी काही नावे आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आयपीएलच्या एका संघात (अंतिम11मध्ये) सात भारतीय तर चार विदेशी खेळाडू असतात. पण ड्युमिनीच्या संघात मात्र हा नियम त्याने वापला नाही. विशेष म्हणजे त्याने त्याच्या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे.

ड्युमिनीने संघात सलामीवीर फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा ख्रिस गेल व डेक्कन चार्जेसला २००९ला चॅम्पियन बनवणारा ऍडम गिलख्रिष्ट यांना स्थान दिले आहे.

तर तीन नंबरला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, चार नंबरला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला घेतले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा एबी डिविलिअर्सला पाचव्या स्थानावर तर सहाव्या आणि सातव्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट राईडर्सचे ऑलराऊंडर किरोन पोलार्ड व आंद्रे रसेल यांना स्थान दिले आहे.

या व्यतिरिक्त ब्रेट ली आणि लसीथ मलिंगा हे दोन जलदगती गोलंदाज तर इमरान ताहीर आणि मुथय्या मुरलीधरन या दोन फिरकी गोलंदाजाना ड्युमिनीने आपल्या संघात निवडले आहे.

आश्चर्यची गोष्ट म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैना यांना या संघात स्थान दिले नाही. त्याने विराट कोहलीला या संघाचे कर्णधार म्हणून निवडले आहे.

ड्युमिनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स,डेक्कन चार्जेस आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधार पदही भूषविले आहे. आयपीएल कारकिर्दीत ८३ सामन्यात १२४.०२ च्या सरासरीने त्याने २०२९ धावा केल्या आहेत. याचबरोबर २३ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

जेपी ड्युमिनीचा ऑलटाइम आयपीएल संघ-
ख्रिस गेल, ऍडम गिलख्रिस्ट, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलिअर्स, किरोन पोलार्ड, आंद्रे रसेल, ब्रेट ली, लसीथ मलिंगा, इम्रान ताहीर, मुथय्या मुरलीधरन

You might also like