जर्मनीची स्टार टेनिसपटू आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली जुलिया जॉर्जेस हिने वयाच्या 31 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने बुधवारी (21 डिसेंबर) आपला निर्णय जहीर केला. ज्युलियाने 2018 मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट नववे स्थान गाठले होते.
तिचा शेवटचा सामना फ्रेंच ओपनमधील दुसर्या फेरीत जर्मनीच्या लॉरा सिगमंड विरुद्ध होता. त्या सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता.
टेनिस खेळाला संबोधून लिहिलेल्या पत्रात जॉर्जेसने लिहिले की “15 वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीनंतर निरोप घेण्यास मी तयार आहे. खेळाचा निरोप घेताना कसे वाटेल हे मला आधीच ठाऊक होते. आता ती वेळ आली आहे. मी माझ्या आयुष्यातील टेनिसचा अध्याय बंद करण्यास तयार आहे आणि नवीन अध्याय सुरू करण्यास तयार आहे, ज्याबद्दल मी खरोखर उत्सुक आहे.”
TIME TO SAY GOODBYE 💭✍️🎾
Announcement in English: https://t.co/Z8oyJUu2ip
Ankündigung auf Deutsch: https://t.co/ri1y8CSU24 pic.twitter.com/ySDqvfdfx3— Jule Goerges✌️🇩🇪 (@juliagoerges) October 21, 2020
विम्बल्डन 2018 च्या उपांत्य फेरीत जुलियाचा दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सकडून सरळ सेटमध्ये पराभव झाला होता. सर्बियाच्या नेनाड झिमोनजिकसह मिश्र दुहेरीत ती फ्रेंच ओपन 2014 मध्ये उपविजेती ठरली होती. जर्मनीमधील 2014 फेड कपच्या अंतिम फेरीतही तिने प्रवेश केला होता.
जुलिया 2011 मध्ये स्टुटगार्ट आणि 2017 मध्ये मॉस्को व डब्ल्यूटीए एलिट ट्रॉफीमध्ये विजेती ठरली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
इस्मानिंग चॅलेंजर: भारताचा स्टार टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने गतविजेत्या लुकासचा केला पराभव
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस मास्टर स्पर्धेत राफेल नदाल होणार सहभागी
दुखापतीतून सावरल्यानंतर रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत होणार सहभागी