मेलबर्न। ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी जगभरातील युवा खेळाडूंना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या आगमनामुळे जगभरातील खेळाडूंना कधी- कधी शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या मेसेजचा सामना करावा लागतो. लँगर यांचा असा विश्वास आहे की, सोशल मीडियापासून दूर राहणे, हा यापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे.
चार्ली वेबस्टरच्या ‘माय स्पोर्टिंग माईंड’ या पॉडकास्ट दरम्यान लँगर यांनी म्हटले, “मी युवा खेळाडूंनाच नाही, तर मी त्या प्रत्येक व्यक्तीला हा सल्ला देईल की, सोशल मीडियापासून दूर राहा.”
लँगर पुढे म्हणाले, “मी असे म्हणण्यामागील कारण असे की, कोणतीही अनोळखी व्यक्ती येऊन मला असे म्हणेल की मी किती चांगला आहे किंवा मी किती वाईट आहे, हे मला नकोय. कारण मला माहीत आहे की मी चांगला खेळत आहे की वाईट.”
“मला हे अनोळखी व्यक्तींकडून अपेक्षित नाही. परंतु मी ज्या लोकांचा सन्मान करतो, माझ्या कुटुंबातील व्यक्ती किंवा माझे मित्र त्यांनी मला हे सांगावे, असे मला अपेक्षित आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
आपल्या संघाबद्दल बोलताना लँगर म्हणाले की, ऑस्ट्रेलिया संघाला मागील वर्षी विश्वचषकात आणि ऍशेस मालिकेदरम्यान ऑनलाईन माध्यमातून शिवीगाळ करण्यात आली होती, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मागील वर्षी न्यूझीलंड संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला होता. नुकतेच त्याने जेव्हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ‘जैव- सुरक्षित’ वातावरणाचे उल्लंघन केले होते, तेव्हाही त्याला इंस्टाग्रामवर वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोहलीला लॉर्ड्सवर क्लिन बोल्ड करण्याची स्वप्ने पाहणारी कोण आहे ही महिला?
-विराट कोहलीला राजस्थान रॉयल्समध्ये घेऊ, पण फक्त एका अटीवर
-भारतीय क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडचा पीपीई किटमध्ये डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ट्रेंडिंग लेख–
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास