पुणे (14 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजचा शेवटचा सामना नंदुरबार जिल्हा विरुद्ध धाराशिव जिल्हा यांच्यात झाला. सामन्याची सुरुवात संथ झाली होती. दोन्ही संघाच्या बचावपटूंनी गुण मिळवले. नंदुरबार संघाने 10 व्या मिनिटाला धाराशिव संघाला ऑल आऊट करत 13-03 अशी आघाडी मिळवली.
मध्यंतरा पर्यत दोन्ही संघाच्या बचावपटूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. नंदुरबार संघाने 16-08 अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतरही नंदुरबार संघाने आपली आघाडी कायम ठेवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. नंदुरबारच्या जयेश महाजन ने अष्टपैलू खेळी गेली. तर तेजस राऊत सुद्धा चांगले गुण मिळवत संघाची आघाडी वाढवली.
नंदुरबार संघाने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व ठेवत सामना 42-19 असा विजय मिळवला. नंदुरबार संघाने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. नंदुरबार संघाच्या जयेश महाजन ने अष्टपैलू खेळी करत 10 गुण मिळवले. तेजस राऊत ने 5 गुण मिळवले. तर श्रेयस उमरदंड ने पकडीत 6 गुण मिळवले. तर धाराशिव संघाकडून अनिकेत भारती ने 6 पकडी केल्या.
बेस्ट रेडर- जयेश महाजन, नंदुरबार
बेस्ट डिफेंडर- श्रेयस उमरदंड, नंदुरबार
कबड्डी का कमाल – अनिकेत भारती, धाराशिव
महत्वाच्या बातम्या –
सांगली संघाने पालघर संघाचा विजयी रथ रोखला
लातूर संघावर मात देत नाशिक संघाने मिळवला दुसरा विजय