पुणे (13 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजची तिसरी लढत सांगली विरुद्ध लातूर यांच्यात झाली. संगलीच्या चढाईपटूंनी व बचावपटूंनी आक्रमक सुरुवात करत 5 व्या मिनिटाला लातूर संघाला ऑल आऊट केले. सांगलीच्या अभिषेक गुंगे व वृषभ साळुंखे यांनी चांगले गुण मिळवले.
लातूर संघाने 1-9 अश्या पिछाडीवरून पलटवार करत सामन्यात चुरस आणली. अजिंक्य कटलेच्या सुपर टेन खेळीच्या जोरावर मध्यंतरापूर्वी लातूर संघाने सांगली संघाला ऑल आऊट केले. मध्यंतराला सामना 19-19 असा बरोबरीत होता. मध्यंतरा नंतर सामना चुरशीचा सुरू होता. 27-28 अशी पिछाडी असताना सांगलीच्या अभिषेक गुंगे ने 5 गुणांची सुपर रेड करत सामना फिरवला. त्यानंतर संगलीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ कायम ठेवला.
सांगली हा सामना 49-32 अश्या मोठ्या फरकाने जिंकला. सांगलीच्या अभिषेक गुंगे ने चढाईत 17 गुण मिळवले तर वृषभ साळुंखे ने 9 गुण मिळवले. तर नवाज देसाई जबरदस्त 7 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. तसेच प्रणव माने सुद्धा 4 पकडी केल्या. लातूर कडून अजिंक्य कटले ने सर्वाधिक 13 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अभिषेक गुंगे, सांगली
बेस्ट डिफेंडर- नवाज देसाऊ, सांगली
कबड्डी का कमाल- अभिषेक गुंगे, सांगली
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy 2024 । मुंबईच्या योद्धा क्रिकेटमधून निवृत्त! हिटमॅनची धवल कुलकर्णीसाठी खास पोस्ट
संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व उपविजेते