fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कबड्डी नियमांची “दौलत” हरपली, दौलतराव शिंदे काळाच्या पडद्याआड

नाशिक जिल्हा कबड्डी असो.चे संस्थापक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दौलतराव दादाजी शिंदे यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने झोपेतच राहात्या घरी निधन झाले. निधनासमयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.

बुवांच्या बरोबरीने त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.मध्ये संयुक्त कार्यवाह म्हणून बरेच वर्ष कार्य केले. नाशिक जिल्हा कबड्डी असो.च्या स्थापनेपासून ते कित्येक वर्षे सरचिटणीस म्हणून काम पहात होते.

काही वर्षे त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून देखील नाशिकचा कार्यभार सांभाळला. अखिल भारतीय हौशी कबड्डी महासंघात देखील त्यांनी पंच मंडळ व तांत्रिक समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले.

त्यांनी १९७२साली पतियाळा येतील चार हप्त्याचे एन आय एस प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी कबड्डी सिलबस व कबड्डीचा इतिहास ही दोन पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिली, तर आधुनिक व शास्त्रीय प्रशिक्षण याचे मराठीत अनुवाद केले.

महाराष्ट्र शासनाने त्यांच्या संघटन कार्याचा गौरवकरित १९९७-९८ सालचा “शिवछत्रपती पुरस्कार” दिला होता. त्यांनी नाशिक बरोबरच महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून देखील काम पाहिले होते.

ते मध्य रेल्वेत कार्यरत होते. वरिष्ठ विभागीय अभियंता म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यांनी कबड्डी या खेळाच्यानिमित्ताने जपान, मलेशिया, थायलंड या देशांचा दौरा देखील केला होता. आज सायं. ५-०० वाजता मनमाड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यांच्या निधनाने कबड्डीच्या नियमांची पूर्ण जाण असलेला व शरद पवारसाहेब व बुवा साळवी यांच्या बरोबर काम केलेला एक खांदा कार्यकर्ता हरपला. आम्हाला त्यांच्या बरोबर काम करायला संधी मिळाली हे भाग्यच! ते शेवटपर्यंत कबड्डीत कार्यरत होते.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

मी खेळत असताना ते राज्य संघटनेत पदाधिकारी होते. महाराष्ट्राच्या घटना व तांत्रिक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. या वयात देखील ते राज्य संघटनेला येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत मार्गदर्शन करीत होते. मी व माझ्या कबड्डी परिवाराच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.-दत्ताभाऊ पाथरीकर – कार्याध्यक्ष (मराक असो.)

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ची घटना दुरुस्ती करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी होते.आमचा एक मार्गदर्शक हरपला.अशा शब्दात सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकेकाळचे शिंदे यांचे सहकारी तसेच राज्य कबड्डी संघटनेचे माजी सरचिटणीस व कार्याध्यक्ष म्हणून काम केलेले मोहन भावसार यांनी देखील त्यांच्या निधनाने दुःख व्यक्त करीत “कबड्डीचा इतिहास काळाच्या पडद्या आड गेला” अशा भावना व्यक्त केल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक

एशियन गेम्स: भारताला कबड्डीत पराभूत करत इराणच्या महिलांनी रचला इतिहास

एशियन गेम्स: हिना सिद्धूला नेमबाजीत कांस्यपदक

You might also like