दिग्गज वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रबाडा त्याच्या दक्षिण आफ्रिका संघासोबत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, ज्याठिकाणी टी-20 विश्वचषक 2022 खेळला जात आहे. पण यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ समोर येत आहे. व्हिडिओत रबाडा मोडकीतोडकी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि काही चुकीचे शब्दही बोलून जातो. आरजे करिश्माने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
रेडिओ जॉकी आरजे करिश्मा (RJ Karishma) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर 3.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. अरिश्माने ही इस्टाग्राम पोस्ट कागिसो रबाडा (Kagiso Rabada) सोबत कोलॅब केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज गोलंदाज आयपीएल खेळण्यासाठी जेव्हा भारतात येतो, तेव्हा अनेकदा त्याला हिंदीत बोलताना पाहिले गेले आहे. आयपीएलमध्ये रबाडा पंजाब किंग्जसाठी खेळतो. परंतु यावेळचा व्हिडिओ अधिक मजेदार आहे. चाहते या व्हिडिओवर पोट धरून हसत आहेत.
आरजे करिश्मासोबतच्या या व्हिडिओ रबाडा नमस्ते म्हणत सुरूवात करतो. व्हिडिओ तो करिश्माचा बॉयफ्रेंड बनला आहे. रबाडा करिश्माच्या आई वडिलांशी बोलून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते, पण यादरम्यान तो काही मजेशीर बोलून जातो. नमस्ते केल्यानंतर पुढे रबाडा म्हणतो, “इस्ट ऑर वेस्ट माय सास इज बेस्ट. तुमचे कुटुंब मिळाल्यामुळे मी धनिया झालो आहे.” रबाडाला धन्य म्हणायचे असते, पण तो धनिया म्हणतो. यानंतर करिश्मा त्याची चूक सावरते. त्यानंतर पुढे बोलताना रबाडा ‘ससुर’ (सासरे) म्हणण्या ऐवजी ‘सुअर’ म्हणतो. हा एक शब्द चुकीच बोलल्यामुळे पूर्ण वाक्याचा अर्थ बदलला आणि चाहत्यांमध्ये व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, करिश्मा ही परिस्थिती कशीबशी सावरते आणि रबाडाला त्याठिकाणाहून घेऊन जाते, असे व्हिडिओत दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CjuTIrMhjce/?utm_source=ig_web_copy_link
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावरी अनेक सुप्रसिद्ध नावांच्या प्रतिक्रिया येत आहे. आयपीएलमध्ये रबाडाचा सहकारी आणि भारतीय दिग्गज शिखर धवनने देखील या व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तोच दरारा तीच दहशत! नेट्समध्ये फलंदाजांना हैराण करताना दिसला शमी; पाहा व्हिडिओ
पियुष चावलाने पार केला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मैलाचा दगड! गुजरातवर सौराष्ट्रचा मोठा विजय