Loading...

पीएमडीटीए-केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरिज मानांकन टेनिस २०१९ स्पर्धेत पार्थ काळे, संमिहन देशपांडे यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत बिगर मानांकीत पार्थ काळेने चौथ्या मानांकीत आदित्य अयंगारचा व संमिहन देशपांडेने नवव्या मानांकीत धृव लिगडेचा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना क्लब येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत बिगर मानांकीत पार्थ काळेने चौथ्या मानांकीत आदित्य अयंगारचा 6-4 असा तर संमिहन देशपांडेने नवव्या मानांकीत धृव लिगडेचा 6-4 असा पराभव केला. अव्वल मानांकीत अव्दिक नाटेकरने स्पर्श मुर्घेचा 6-1 असा तर दुस-या मानांकीत अभिराम निलाखेने क्रिशांक जोशीचा 6-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. तिस-या मानांकीत अर्जुन किर्तनेने अर्णव भाटीयाचा 6-0 असा सहज पराभव केला.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात तेज ओकने देवेन चौधरीचा तर शैर्य राडेने रोहन बजाजचा अनुक्रमे 6-1असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. शिवांश कुमारने मानस सोमवंशीचा 6-3 असा तर शैनक रणपीसेने ललित मोरेचा 6-0 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-

पहिली फेरी- 12 वर्षाखालील मुले

Loading...

पार्थ काळे वि.वि आदित्य अयंगार(4) 6-4

संमिहन देशपांडे वि.वि धृव लिगडे (9) 6-4

अव्दिक नाटेकर(1) वि.वि स्पर्श मुर्घे 6-1

अभिराम निलाखे(2) वि.वि क्रिशांक जोशी 6-0

Loading...

अर्जुन किर्तने(3) वि.वि अर्णव भाटीया 6-0

शिवराज श्रीफुले(7) धृव डोग्रा 6-1

मनन अगरवाल(5) वि.वि सिध्दांत कुलकर्णी 6-1

यश अत्रे वि.वि मिहिर केळकर 6-2

Loading...

पृथ्विराज दुधाने वि.वि स्वरनिम येवलेकर 6-4

14 वर्षाखालील मुले

तेज ओक वि.वि देवेन चौधरी 6-1

शिवांश कुमार वि.वि मानस सोमवंशी 6-3

शैनक रणपीसे वि.वि ललित मोरे 6-0

Loading...

शैर्य राडे वि.वि रोहन बजाज 6-1

You might also like
Loading...