येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. तर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. अशातच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने अशी माहिती दिली आहे की, कर्णधार केन विलियमसन आणि मिचेल सँटनर या दोघांनाही दुखापत झाली आहे. विलियमसनच्या कोपरला दुखापत झाली आहे. तर मिचेल सँटनरच्या बोटांना दुखापत झाली आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसरा कसोटी सामना येत्या १० जून पासून सुरू होणार आहे. मिचेल सँटनर हा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तर कर्णधार केन विलियमसन खेळणार की नाही यावर बुधवारी (९ जून) निर्णय घेतला जाणार आहे.
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात केन विलियमसनचे खेळणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण केन विलियमसनसाठी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याआधी ही शेवटची संधी आहे. हा सामना झाल्यानंतर न्यूझीलंड संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यामुळे केन विलियमसनने या सामन्यात चांगली कामगिरी केली तर, मोठ्या सामन्यात त्याचा आत्मविश्वास वाढेल.
त्याला पहिल्या कसोटी सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. लॉर्ड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने फक्त १३ आणि १ धाव केली होती. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत बलाढ्य भारतीय संघाला पराभूत करायचे असेल केन विलियमसनचे फॉर्ममध्ये असणे गरजेचे आहे.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत २०२०-२१ कसोटी मालिकेचा मोठा गौरव; भारतीय चाहते ऐकून होतील खूश
वाढदिवस विशेष: प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला, वाचा ‘त्या’ क्रिकेटरची कहाणी