वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दोन संघात झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला, तर एक सामना अनिर्णित राहिला. टी20 मालिकेनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून (3 डिसेंबर) सुरुवात झाली. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने द्विशतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने पडला आणि कर्णधार जेसन होल्डरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या 14 धावांवर या संघाला पहिला धक्का बसला. सलामीवीर विल यंग (5 धावा) याला वेगवान गोलंदाज गब्रीएलने पायचीत केले.
यंग माघारी परतल्यावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन फलंदाजीसाठी आला. त्याने संघाची जबाबदारी योग्यपणे सांभाळून संयमी खेळी केली. सलामीवीर टॉम लेथम यानेही त्याला सुरेख साथ दिली. लेथम आणि विलियम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली.
लेथम 86 धावांवर माघारी परतला. मात्र, विलियम्सन सावधपणे खेळी करत खेळपट्टीवर टिकून खेळला. पहिला दिवसअखेर न्यूझीलंड 2 बाद 243 अशा मजबूत स्थितीत होता. विलियम्सन 97 धावांवर नाबाद होता.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच पहिल्या उत्तरार्धात विलियम्सनने विक्रमी शतक नोंदवलं. विलियम्सनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 22 शतक होतं. वेस्ट इंडिज विरुद्ध हे त्याचे तिसरे शतक होते. तसेच कर्णधार म्हणून हे त्याचे 9 वे शतक होते. या शतकासह न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकलं.
एवढेच नाही तर त्याने दुसऱ्या सत्रात त्याचे कसोटीतील द्विशतकही पूर्ण केले. त्याने ३६९ चेंडूत त्याच्या द्विशतकाला गवसणी घातली.
त्याने केलेल्या विक्रमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
न्यूझीलंडकडून कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू :
केन विलियम्सन – 9 शतके
स्टीफन फ्लेमिंग – 8 शतके
ब्रेंडन म्यॅक्यूलम – 6 शतके
बेवन कोन्गडन – 4 शतके
मार्टिन क्रू – 4 शतके
डॅनियल व्हिटोरी – 4 शतके
विलियम्सनने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात प्रत्येक संघाविरुद्ध ठोकलेल्या शतकांची यादी
बांगलादेश – 3 शतके
इंग्लंड – 3 शतके
दक्षिण आफ्रिका – 3 शतके
श्रीलंका – 3 शतके
वेस्ट इंडिज – 3 शतके
भारत – 2 शतके
पाकिस्तान – 2 शतके
ऑस्ट्रेलिया – 2 शतके
झिम्बाब्वे – 1 शतक
यासह त्याने घरच्या मैदानावर 11 शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर देशाबाहेरही त्याने 11 शतके झळकावली आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून कसोटी सर्वाधिकवेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
3 – स्टिफन फ्लेमिंग
3 – ब्रेंडन मॅक्यूलम
2 – केन विलियम्सन
1 – ग्रॅहम डॉवलिंग
1 – मार्टिन क्रो
महत्त्वाच्या बातम्या –
रबाडानंतर ‘हा’ खेळाडूही बाहेर; इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचा मोठा निर्णय
‘पंड्या आणि जडेजाने सामना हिसकावून घेतला’, पराभूत झाल्यानंतर मॅक्सवेलची मोठी प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर