न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात रविवारी (२० डिसेंबर) दुसरा टी२० सामना झाला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्याद्वारे न्यूझीलंड क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सनने पुनरागमन केले. विलियम्ससन व्यतिरिक्त काईल जेमिसन, टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट हेदेखील संघासोबत जुळले आहेत. विलियम्सनने आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी पत्नीसोबत राहता यावे म्हणून वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. काही दिवसांपूर्वीच तो एका गोंडस मुलीचा पिता बनला आहे.
न्यूझीलंडच्या खेळाडूंकडून विलियम्सनचे जोरदार स्वागत
अशात नुकताच बाबा बनलेला विलियम्सन न्यूझीलंड टी२० संघासोबत जुडल्यानंतर संघसहकाऱ्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू रॉस टेलर आणि मार्टिन गप्टील यांनी विलियम्सनची गळाभेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विलियम्सनच्या संघातील आगमनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Look who’s back 👀👶
We couldn’t keep new father Kane Williamson away from the nets for long as he rejoins the T20 squad in Hamilton ahead of Sunday night’s 2nd T20I 👍#NZvPAK #CricketNation pic.twitter.com/D2LhtbA538— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 19, 2020
Kane Williamson is back as New Zealand captain for the second T20I 😎
Kyle Jamieson, Tim Southee and Trent Boult also return!#NZvPAK pic.twitter.com/h6TEVf09YJ
— ICC (@ICC) December 20, 2020
केन विलियम्सनची टी२० आकडेवारी
विलियम्सनच्या टी२० क्रिकेटमधील आकडेवारीविषयी बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत ६० सामने खेळले आहेत. दरम्यान ३२.६४च्या सरासरीने त्याने १६६५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ११ अर्धशतकांचा समावेश आहे. असे असले, तरीही विलियमन्सला आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये एकदाही शतक झळकावता आलेले नाही.
टी२० मालिकेची सुरुवात विजयाने
यापूर्वी इडन पार्क, ऑकलँड स्टेडियमवर १८ डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला ५ विकेट्सने नमवले होते. यासह मालिकेत त्यांनी १-०ने आघाडी मिळवली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ९ बाद १५३ धावा केल्या होत्या. यात कर्णधार शादाब खानच्या ४२ धावांच्या तूफानी खेळीचा समावेश होता. प्रत्युत्तरादाखल यष्टीरक्षक फलंदाज टीम सिफर्टने ५७ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. तसेच जॅकब डफी (४ विकेट्स) आणि स्कॉट कुग्लेजीन (३ विकेट) यांच्या गोलंदाजीचाही मोठा हातभार लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत ५ शतके ठोकणारा ‘तो’ खेळणार दुसरा कसोटी सामना?, मोहम्मद कैफचा जबरदस्त तोडगा
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात ‘हे’ ५ बदल
भारताविरुद्ध कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणाऱ्या जोश हेजलवूडने उलगडला आपला ‘गेम प्लॅन’
ट्रेंडिंग लेख-
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व
भारतीय संघाचे ६ धडाकेबाज खेळाडू, ज्यांनी २०२० मध्ये केले क्रिकेटला ‘बाय बाय’
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात ‘हे’ ५ बदल