fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएल २०१९: आजीचे निधन झाल्याने हा खेळाडू खेळणार नाही आजचा सामना

चेन्नई। आज(23 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात होणार आहे. पण या सामन्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सन मुकणार आहे.

त्याच्या आजीचे निधन झाल्याने तो मायदेशी परतणार आहे. त्याचमुळे त्याला या सामन्याला मुकावे लागणार आहे.

तो 27 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादच्या सामन्याआधी पुन्हा भारतात परतेल अशी अपेक्षा आहे.

त्याच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. त्याने याआधीही या आयपीएल मोसमात 5 सामन्यात हैद्राबादचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले आहे.

विलियम्सन या आयपीएल मोसमात खांद्याच्या दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकला आहे. तसेच त्याला या मोसमात खास काही करता आलेले नाही. त्याने खेळलेल्या 4 सामन्यात त्याला फक्त 28 धावाच करता आल्या आहेत.

तो 2018 च्या आयपीएल मोसमातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 2018 च्या आयपीएलमध्ये 735 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषकाच्या निवडीचा विचार होता डोक्यात, रिषभ पंतचा खुलासा

तेव्हा धोनी आता पृथ्वी शॉ, जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मिळाले जीवदान, पहा व्हिडिओ

आयपीएल २०१९चा अंतिम सामना चेन्नईला नाही तर होणार या ठिकाणी

You might also like