भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. 12.5 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने मैदानात हजेरी लावली आणि पंचांना हा सामना अर्ध्यात थांबवला. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 7 विकेट्सने विजय मिळवला असून दुसऱ्या सामन्यात देखील त्यांचा संघ विजय मिळवण्याच्या हेतूने खेळत होत. मात्र, सामना रद्द झाल्यामुळे त्यांची देखील चांगलीच नाराशा झाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने सामना रद्द झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली.
पावसामुळे एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पूर्ण होऊ शकला नाही, यामुळे दोन्ही संघातील खेळाडू नाराज आहेत. केन विलियम्सन (Kane Williamson) देखील याच कारणास्तव नाराज असल्याचे दिसले. न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतील प्रदर्शन पाहिले तर आतापर्यंत चांगले राहिले आहे. कर्णधार केन विलियम्सन देखील संघाच्या प्रदर्शनावर खुश आहे, पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने खोळंबा केल्यामुळे मात्र तो चांगलाच नाराज झाला आहे.
माध्यमांशी बोलताना विलियम्सन म्हणाला की, “पावसामुळे सामना गमावणे निराशाजनक आहे. संघाने चांगले प्रदर्शन केले, टॉम लॅथमने मागच्या सामन्यात दमदार खेळी केली. ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण असू शकते, त्यावर आपम लक्ष दिले पाहिजे. मागच्या सामन्यात संघासाठी फलंदाजीमध्ये योगदान देणे चांगले राहिले.” दरम्यान, एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम आणि केन विलियम्सन यांनी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. लॅथमने नाबाद 145 धावा केल्या, विलियम्सनने नाबाद 94 धावांची खेळी केली.
भारतीय संघाने या सामन्यात 300 पेक्षा मोठी धावसंख्या केली होती, पण या दोघांच्या वादळी खेळीपुढे हे लक्ष्य देखील कमी पडले. न्यूझीलंडने हा सामना 47.1 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर जिंकला होता. पावसामुळे पूर्ण न होऊ शकलेल्या दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर भारतासाठी सूर्यकुमार यादव 34 आणि शुबमन गिल 45 धावांची नाबाद खेळी करू शकले. 12.5 षटकामध्ये भारताने एका विकेटच्या नुकसानावर 89 धावा केल्या होत्या. (Kane Williamson’s reaction after the match was called off due to rain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानमध्ये पोहोचताच स्टोक्सने फुंकले रणशिंग; म्हणाला, “इथे आम्ही फक्त…”
सोनियाचा दिनु! पीटी उषा बनणार भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष