भारताचे विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांना क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू मानले जाते. त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या अनुभवानुसार क्रिकेटमधील विविध विषयांवर विविधं मतं व्यक्त करत असतात. नुकतेच त्यांनी सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलूबद्दल मोठे भाष्य केले आहे.
जेव्हा सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचे नाव विचाराल, तेव्हा भारताच्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराने रविचंद्रन अश्विनश आणि रवींद्र जडेजाचे नाव घेतले. मात्र, गोलंदाज म्हणून जडेजाचा खेळ जरा खराब झाल्याचे त्यांनी मान्य केले.
कोलकाताच्या रॉयल कलकत्ता गोल्फ कोर्समध्ये कपिल देव उत्तम अष्टपैलूबद्दल म्हणाले, “मी अश्विन म्हणेल, त्याला सलाम. जडेजाही…तो किती चांगला क्रिकेटर आहे, पण दुर्दैवाने, तो एक फलंदाज म्हणून सुधारला आहे आणि माझ्यासाठी तो एक गोलंदाज आहे.”
जडेजाबाबत ते म्हणाला, “जेव्हा त्याने सुरुवात केली तेव्हा तो एक चांगला गोलंदाज होता, पण आता तो एक चांगला फलंदाज आहे. ज्या वेळी भारताला त्याची गरज पडेल तेव्हा, त्याला धावा मिळतील. पण गोलंदाज म्हणून तो चांगली कामगिरी करत नाही.”
भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या नियुक्तीवर कपिल देव यांनी म्हटले की त्याच्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा संघाला प्रशिक्षक म्हणून फायदा होईल.
कपिल देव म्हणाले, “तो एक चांगला व्यक्ती आहे, एक चांगला क्रिकेटर आहे. तो प्रशिक्षक म्हणून क्रिकेटपटूपेक्षा चांगले काम करेल, कारण त्याच्यापेक्षा क्रिकेटमध्ये कोणीही चांगले काम केलेले नाही. मी फक्त आशा ठेवत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
कानपूर कसोटीत व्हायरल झालेला ‘गुटखा मॅन’ म्हणतोय, “आता मी वैतागलोय”
‘या’ तीन भारतीय फलंदाजांनी केले प्रेक्षकांचे मनोरंजन, कसोटीत देखील मारले सर्वाधिक षटकार