भारत देशाला सन 1983 मध्ये विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांना शुक्रवारी (24 ऑक्टोबर) हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना लगेचच दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी भारतीय खेळाडू आणि चाहते प्रार्थना करत होते. पण आता कपिल देव यांची तब्येत सुधारत आहे आणि स्वत: कपिल देव यांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
आपल्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कपिल देव यांनी लिहिले की “तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि चिंता व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. मी बरा होण्याच्या मार्गावर आहे. सर्वांना माझ्या शुभेच्छा.
— Kapil Dev (@therealkapildev) October 23, 2020
छातीत दुखण्याची केली होती तक्रार
शुक्रवारी (24 ऑक्टोबर) कपिल देव यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दिग्गजांनी आणि चाहत्यांनी केली प्रार्थना
कपिल देव यांची प्रकृती ढासळल्याची बातमी समजताच क्रिकेट जगतातीलल सर्व दिग्गज त्यांच्या उत्तम स्वास्थासाठी प्रार्थना करत होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ट्विट केले होते.
कपिल देव यांची कारकीर्द
कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या 225 वनडे सामन्यात 253 बळी घेतले आहेत. त्याच बरोबर 131 कसोटी सामन्यात त्यांनी 434 बळी घेतले आहेत. तसेच वनडेत त्यांनी 3783 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 5248 धावा त्यांनी कसोटीत केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु
-कपिल देव यांना हृद्यविकाराचा झटका; सचिनसह ‘या’ क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
‘धोनी बरोबर होता, चेन्नईच्या युवा खेळाडूंमध्ये…’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर उडाली टीकेची झोड
ट्रेंडिंग लेख –
-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
-शशी कपूर यांना लॉर्ड्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कपिल देव यांनी केली अशी आयडिया…
-वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी