भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना काहीदिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. पण आता ते या आजारातून सावरले असून त्यांनी गोल्फ खेळायलाही सुरुवात केली आहे. याबद्दल त्यांनीच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत माहिती दिली आहे.
कपिल देव आवड म्हणून बऱ्याचदा गोल्फ खेळतात. विशेष म्हणजे त्यांनी अनेकदा विविध गोल्फ स्पर्धांमध्ये सहभागही घेतला आहे. नुकतेच ते दिल्ली गोल्फ क्लबमध्ये खेळताना दिसले होते.
त्यांनी गोल्फ खेळतानाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘गोल्फ कोर्स किंवा क्रिकेट मैदानावर पुनरागमन करणे किती मजेदार आहे, हे शब्दात व्यक्त करु शकत नाही. गोल्फ कोर्सवर परत आलोय, मित्रांसह मस्ती करणे आणि खेळणे, हे सर्व खूप मस्त आहे. हेच आयुष्य आहे.’
Good to be back on the Golf Course …. pic.twitter.com/M3V6D7KEoF
— Kapil Dev (@therealkapildev) November 12, 2020
मागील महिन्यात आला होता हृदय विकाराचा झटका –
भारताला पहिले विश्वविजेतेपद जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना मागील महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. यानंतर त्यांनी दूरदर्शनवर क्रिकेट विश्लेषक म्हणूनही आपले काम पुन्हा सुरु केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
-कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; माजी भारतीय क्रिकेटरने शेअर केला फोटो
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस
हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल… राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल
ट्रेंडिंग लेख –
-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
-शशी कपूर यांना लॉर्ड्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कपिल देव यांनी केली अशी आयडिया…
-वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी