सध्याच्या भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तरीही संघ प्रामुख्याने वरच्या फळीतील तीन खेळाडूंच्या अर्थात रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या प्रदर्शनावर अवलंबून असल्याचे पहायला मिळते. मात्र, जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो त्यावेळी या खेळाडूंवर दबाव असल्याने हे खेळाडू लवकर बाद होत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. याच गोष्टीवर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
कपिल देव यांनी एका युट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “जेव्हा संघाला धावा काढण्याची गरज असते तेव्हा हे तिघे बाद होतात. जेव्हा डाव सावरण्याची वेळ येते तेव्हा ते बाद होतात आणि त्यामुळे दबाव वाढतो. भारतीय संघासाठी अनेक सलामीवीर उपलब्ध आहेत ज्यांची चांगली खेळण्याची जाणीवपूर्वक मानसिकता आहे जे टी२० फॉरमॅटसाठी आवश्यक आहे. जर राहुल आणि रोहित समान दिनचर्येला चिकटून राहिले तर ते खूप चांगले बदल घडवू शकतात. मात्र, यासाठी दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे.”
सोबतच, “आगामी टी२० विश्वचषक भारतात आणयचा असेल तर या तिनही खेळाडूंना विशेष लक्षपूर्वक कामगिरी करावी लागेल. यासाठी फलंदाजी करत असताना आपली मानसिकता बदलावी लागेल. जर हे शक्य झाले तर भारतीय संघ आणखी चांगले प्रदर्शन करू शकेल. मात्र, त्यासाठी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला पुढाकार घ्यावा लागेल, असेही कपिल देव म्हणाले.”
दरम्यान, २०१९साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत देखील न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले होते. त्यामुळे भारताला त्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. शिवाय या तिनही फलंदाजांच्या खराब खेळीमुळे भारताला विश्वचषकापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे आता यंदाच्या टी२० विश्वचषकात या तिनही खेळाडूंनी भारताचा डाव सांभाळावा आणि संघाला जेतेपदापर्यंत न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धोनी, सेहवाग, रैना सर्वच झाले निवृत्त, पण ‘त्या’ सामन्यात खेळलेला कार्तिक आजही टीम इंडियात
रहाणे आणि शर्माचे वय झालंय; ऑस्ट्रेलियच्या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान
आरसीबीने नाही दिला चान्स, पण इंग्लंडच्या टी२० लीगमध्ये गाजलाय ‘हा’ खेळाडू






