---Advertisement---

चॅम्पियन्य ट्राॅफीमध्ये भारतीय संघात निवड न झाल्याने संतापला ‘हा’ खेळाडू! म्हणाला…

---Advertisement---

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू होईल. त्यामध्ये जगातील सर्वोत्तम 8 क्रिकेट संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. ज्यासाठी सर्व संघांनी आपले 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या 15 सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये ‘करुण नायर’च्या (Karun Nair) नावाचा समावेश नाही.

अलिकडेच अनेक देशांतर्गत सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नायरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळेल अशी आशा होती. पण तसे झाले नाही.

अनेक माध्यमांमध्ये असे म्हटले आहे की, 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचे नाव समाविष्ट न केल्याबद्दल करुण नायर निवडकर्त्यांवर नाराज आहे. पण अलीकडेच, भारतीय संघाचे निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी अनेक खेळाडूंची नावे या यादीत समाविष्ट न होण्याचे कारण स्पष्ट केले. त्यानंतर आता नायरने आपले मौन सोडत मोठे वक्तव्य केले आहे.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील वनडे मालिकेपूर्वी, जेव्हा नायरची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली नाही, तेव्हा अजित आगरकरने परिस्थिती स्पष्ट केली होती. आगरकर म्हणाले होते, “सध्या या संघात स्थान मिळवणे खूप कठीण आहे. निवडलेल्या खेळाडूंकडे पहा. प्रत्येकाची सरासरी 40च्या वर आहे. दुर्दैवाने, तुम्ही 15 जणांच्या संघात सर्वांना स्थान देऊ शकत नाही. पण त्या कामगिरीचा निश्चितच विचार केला जातो. जर एखाद्या खेळाडूचा फॉर्म बिघडला किंवा तो जखमी झाला तर त्याच्याबद्दल नक्कीच चर्चा होईल.”

अजित आगरकर यांच्या विधानावर करुण नायरने आपली प्रतिक्रिया दिली. रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर रेव्हस्पोर्ट्झशी बोलताना तो म्हणाला, “स्पष्ट विधान करण्यात आले हे पाहून बरे वाटले आणि मला वाटते की त्यांनी त्यांचे विचार स्पष्ट केले आहेत, ज्यामुळे खेळाडूला कुठे जायचे आहे आणि त्याने काय करावे हे समजणे सोपे होते. सध्या माझे पूर्ण लक्ष रणजी ट्रॉफी जिंकण्यावर आहे.”

2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती

करूण नायरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 6 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. 6 कसोटी सामन्यात त्याने भारतासाठी 7 डावात फलंदाजी करताना 374 धावा केल्या आहेत, त्यामध्ये त्याने 1 शतक झळकावले आहे, तर 1 त्रिशतक देखील झळकावले आहे. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 374 राहिली आहे. 2 वनडे सामन्यात भारतासाठी 46 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 39 आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 महाराष्ट्र केसरी ठरले पदकाचे मानकरी, हर्षवर्धन, अमृताला कास्यपदक
७१व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा: हॉकीत महाराष्ट्राला कांस्यपदक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---