मुंबई । भारतीय फलंदाज करुण नायर कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे सावरला आहे. आता तो किंग्स इलेव्हन पंजाबबरोबर पुढच्या आठवड्यात युएईला जाऊ शकेल. पण त्याआधी संघाच्या प्रोटोकॉलनुसार त्याला आणखी तीन कोरोना टेस्ट करून घ्याव्या लागतील. त्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच तो संघात सामील होईल.
8 ऑगस्ट रोजी करुणचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, करुण दोन आठवड्यांपासून आयसोलेशनमध्ये होता आणि 8 ऑगस्ट रोजी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीम मॅनेजमेंटच्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी फक्त तेच खेळाडू युएईला जातील जे कोरोना टेस्टमध्ये निगेटिव्ह येतील.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार नायर प्रथम बंगळूरहून चार्टर फ्लाइटमार्गे दिल्लीला आणि तेथून युएईकडे पंजाब संघातील उर्वरित खेळाडूंसह उड्डाण करेल.
नायरने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 14 सामन्यांत 306 धावा केल्या आहेत. त्याने दोन अर्धशतकेही केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 134.80 आहे.
कोरोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयोजीत करण्यात आले आहे. त्यामुळे युएईला जाताना आणि तिथे गेल्यानंतर खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांना कोरोना टेस्ट प्रक्रियेतून जावे लागेल. युएईमध्ये एक आठवडा क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर खेळाडूंना प्रशिक्षणामध्ये भाग घेता येईल.
त्याचवेळी, युएई सरकारच्या कोरोना नियमांनुसार, देशात येणार्या कोणत्याही बाहेरील व्यक्तीचा कोरोना अहवाल 96 तास अगोदर निगेटिव्ह असणे आवश्यक आहे.
स्पर्धेदरम्यान दर 5व्या दिवशी एक कोरोना टेस्ट होईल
युएईमध्ये आयपीएल दरम्यान दर पाचव्या दिवशीही खेळाडूंची कोरोना टेस्ट होईल. हॉटेलमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटायलाही बंदी आहे. केवळ तीन निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच, खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश करू शकतील आणि प्रशिक्षिणास सुरुवात करतील.
कालच(13 ऑगस्ट) राजस्थान रॉयल्सने आपला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याज्ञिकला कोरोनाला संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. राजस्थान संघानेही गेल्या 10 दिवसांत दिशांतच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांची कोरोना टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले होते.
महत्त्वाच्या बातम्य-
‘खेळाडूंनो सोशल मीडियापासून दूर राहा,’ पाहा कोण म्हणतंय
विक्रम तर अनेक होतील, पण युसूफ-इरफानचा ‘हा’ विक्रम मोडणे केवळ कठीण
कोहलीला लॉर्ड्सवर क्लिन बोल्ड करण्याची स्वप्ने पाहणारी कोण आहे ही महिला?
ट्रेंडिंग लेख –
भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास
डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पहा कोण आहे यष्टीरक्षक
असे ५ क्रिकेटर, जे आहेत डावखुरे फलंदाज परंतु करतात उजव्या हाताने गोलंदाजी