पुणे। डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या जॅक लौतीत, अर्णव पतंगे यांनी तर, मुलींच्या गटात तोमको कातो या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत एकेरीत मुलींच्या गटात पात्रता फेरीतून भारताच्या अर्णव पतंगे याने पाचव्या मानांकित चेक प्रजाकसत्ताकच्या मथास मुसीलचा 2-6, 6-4, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. न्यूझीलंडच्या जॅक लौतीत याने जपानच्या आठव्या मानांकित दायसुके इनग्वा याचा 7-5, 5-7, 7-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित भारताच्या देव जावीया याने क्वालिफायर आदित्य बलसेकरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलींच्या गटात जपानच्या तोमको कातो हिने भारताच्या दुसऱ्या मानांकित विपाशा मेहरावर 4-6, 6-7(4), 6-4 असा सनसनाटी विजय मिळवला. चीनच्या थियांमी मी हिने थायलंडच्या सहाव्या मानांकित सलकथिप ओनमूआंगचा 6-2, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली. रशियाच्या अव्वल मानांकित मारिया शोल्कोवा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत क्वालिफायर सायना देशपांडेचा 6-1, 6-1 असा सहज पराभव केला. वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकर हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत चीनच्या क्यूओनयु लुईचे आव्हान 5-7, 6-3, 6-1 असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी:
मुले:
पेटॉर्न हंचायकुल(थायलंड)(1)वि.वि.अखिलेन्द्रन इंद्रबालन(भारत) 6-2, 6-0;
उदित गोगोई(भारत)वि.वि. सुशांत दबस(भारत) 4-6, 6-4, 3-2 Conceded;
वितेक होरक(चेक प्रजासत्ताक)वि.वि.चिराग दुहान(भारत)6-1, 6-4;
जॅक लौतीत(न्यूझीलंड)वि.वि.दायसुके इनग्वा(जपान)(8)7-5, 5-7, 7-5;
आर्यन भाटिया(भारत)वि.वि.तेनत्वान ताडेडो(थायलंड)6-2, 6-2;
अर्णव पतंगे(भारत)वि.वि.मथास मुसील(चेक प्रजाकसत्ताक)(5) 2-6, 6-4, 6-3;
देव जावीया(भारत)(2)वि.वि. आदित्य बलसेकर(भारत) 6-2, 6-3;
रोस्टीस्लाव गॅलफिंगर(कझाकस्तान)(3)वि.वि. रिकुतो यामागूची(जपान)6-1, 6-3;
मुली:
मारिया शोल्कोवा(रशिया)(1)वि.वि.सायना देशपांडे(यूएसए)6-1, 6-1;
वैष्णवी आडकर(भारत)वि.वि.क्यूओनयु लुई(चीन)5-7, 6-3, 6-1;
झिजून जियांग(चीन)(7)वि.वि.सायका ईशी(जपान)3-6, 6-1, 6-4;
लांलाना तारारुडी(थायलंड)(3)वि.वि.जिऑन झुई(चीन)6-2, 6-3;
मई हासेग्वा(जपान)(8)वि.वि. भक्ती शहा(भारत)6-2, 6-3;
तोमको कातो(जपान)वि.वि.विपाशा मेहरा(भारत)(2)4-6, 6-7(4), 6-4;
संदीप्ती सिंग राव(भारत)वि.वि.किरारा मोरीओका(जपान)6-4, 6-0;
थियांमी मी(चीन)वि.वि.सलकथिप ओनमूआंग(थायलंड)6-2, 7-5;