इंग्लंडचा माजी कर्णधार व आक्रमक फलंदाज केविन पीटरसन हा नेहमी ट्विटरवर काहीतरी मजेशीर ट्विट करत असतो. सध्या भारतामध्ये आयपीएल २०२१ च्या १४ व्या हंगामात तो इंग्लिश समालोचन करताना दिसत आहे. पीटरसनने नुकतेच आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत अजब मागणी केली असून, त्यावर विचार करण्यात यावा अशी विनंती देखील केली आहे.
पीटरसनने केली ही मागणी
आपल्या जमान्यातील एक तडाखेबंद फलंदाज असलेला पीटरसन निवृत्तीनंतर समालोचक म्हणून काम करत आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएलमध्ये तो समालोचक गटाचा भाग असून, त्यातून तो क्रिकेटचे बारकावे देखील समजावून सांगताना दिसतो. पीटरसनने नुकतेच आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. त्यामध्ये पीटरसनने लिहिले, “मला वाटते टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजाने १०० मीटरपेक्षा अधिक लांबीचा षटकार ठोकल्यास १२ धावा देण्यात याव्या. इंग्लंड क्रिकेट आयोजित करणाऱ्या हंड्रेड लीगमध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो.” या ट्विटमध्ये त्याने आयसीसी व इंग्लंड क्रिकेट बोर्डाला टॅग केले आहे.
हे होतील फायदे
पीटरसनने आणखी एक ट्विट करत हा नियम लागू केल्यास होणारे फायदे सांगितले आहेत. त्याने लिहिले, “कोणताही सामना अखेरच्या षटकाशिवाय समाप्त होणार नाही. त्यामुळे रोमांचकता वाढेल. या नियमामुळे प्रायोजक आकर्षिले जातील. प्रसारणकर्त्यांना देखील फायदा होईल.” असे झाल्यास चौकार व षटकारानंतर २ पेक्षा जास्त धावा देणारा हा तिसरा फटका होईल.
आयपीएलमध्ये समालोचन करत आहे पीटरसन
इंग्लंडचा माजी कर्णधार असलेला पीटरसन सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. पीटरसनने यापूर्वी आयपीएलमध्ये देखील आपली कौशल्ये दाखवली आहेत. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स व रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेट लीचेही पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल, भारताला केली तब्बल इतक्या रुपयांची मदत
केवळ ३७ चेंडूत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाला विराट कधी देणार संधी? चाहत्यांना पडला प्रश्न