fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत वेदांत खानवलकर, सनत कडले ,शौनक रणपीसे, विहान तिवारी यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत वेदांत खानवलकर, सनत कडले, शौनक रणपीसे व विहान तिवारी यांनी नामांकीत खेळाडूंवर मात करत स्पर्धेत आगेकुच केली.

अक्षय शहाणे टेनिस अकादमी, भुगाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या फेरीत बिगर मानांकीत वेदांत खानवलकर याने अव्वल मानांकीत राम मगदुमचा 5-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. सनत कडलेने तिस-या मानांकीत संमिहन देशमुखचा 5-1 असा तर शौनक रणपीसेने सातव्या मानांकीत वैष्णव रानवडेचा 5-2 असा पराभव केला. विहान तिवारीने आठव्या मानांकीत विरेन चौधरीचा 5-0 असा सहज पराभव करत विजय नोंदवला.

8 वर्षाखालील मुलांच्या दुस-या फेरीत निल बोंद्रेने अंशुल पुजारीचा 5-4, 7-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. युग उपरीकर याने दिवित गोसावीचा 5-2 असा तर जय थापडेने आर्यन बॅनर्जीचा व निल देसाईने अर्णव पांडेचा अनुक्रमे 5-0 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

तिसरी फेरी: 10 वर्षाखालील मुले:
वेदांत खानवलकर वि.वि राम मगदुम (1) 5-2
सनत कडले वि.वि संमिहन देशमुख (3) 5-1
शौनक रणपीसे वि.वि वैष्णव रानवडे (7) 5-2
विहान तिवारी वि.वि विरेन चौधरी (8) 5-0
स्वरनीम येवलेकर(6) वि.वि वेद मोघे 5-3
अथर्व येलभर वि.वि प्रज्ञेश शेळके 5-1
नमिश हुड (2) वि.वि पृथ्विराज दुधाने 5-3

दुसरी फेरी: 8 वर्षाखालील मुले:
निल बोंद्रे वि.वि अंशुल पुजारी 5-4, 7-3
युग उपरीकर वि.वि दिवित गोसावी 5-2
जय थापडे वि.वि आर्यन बॅनर्जी 5-0
स्मित उंद्रे वि.वि शौर्य गडाडे 5-1
निल देसाई वि.वि अर्णव पांडे 5-0

You might also like