fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेलो इंडिया: शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडानगरी गजबजली

पुणे। शालेय मुलामुलींनी क्रीडानगरीस भेट देऊन विविध क्रीडा स्पर्धांचा अनुभव घ्यावा व खेळाडूंबरोबर संवाद साधावेत, हा खेलो इंडिया महोत्सवामागील हेतू सफल झाला आहे. शालेय विद्याार्थ्यांची भेटींमुळे शिवछत्रपती क्रीडानगरी गजबजली आहे. केवळ पुणे व पिंपरी चिंचवड शहर नव्हे तर बारामती, खेड, जुन्नर, इंदापूर आदी अनेक तालुक्यांमधील काही शाळांनी खेलो इंडिया पाहण्याच्या सहलींचे आयोजन केले आहे.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे म्हाळुंगे बालेवाडीतील क्रीडानगरीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खेलो इंडियातील सामने दिवसभर सुरु असतात. त्यामुळे येथे भेट देणा-या शालेय विद्याार्थ्यांंना कोणत्या ना कोणत्या तरी खेळांचे सामने पाहण्याची संधी मिळत आहे. या विद्याार्थ्यांना विविध सामन्यांबाबत अद्याावत माहिती देण्यासाठी क्रीडानगरीत ठिकठिकाणी माहिती केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये दररोज कोणते सामने किती वाजता होणार आहेत. हे सामने कोणकोणत्या स्टेडियम्सवर आहेत, आदी माहिती तेथे दिली जात आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंची ठिकठिकाणी पोस्टर्स

स्टेडियम्समध्ये ठिकठिकाणी सुशीलकुमार, मेरी कोम, सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आदी अनेक ऑलिंपिक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची पोस्टर्स उभारण्यात आली आहेत. या पोस्टर्सजवळ उभे राहून छायाचित्रे काढण्यासाठीही विद्याार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी राज्य क्रीडा खात्यातर्फे माहितीपटही दाखविण्यात आहे. हा माहितीपट पाहण्यासाठीही या विद्यार्थ्यांमध्ये उत्कंठा दिसून आली. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या शुभंकरबरोबर छायाचित्रे काढून घेण्यासाठी या विद्याार्थ्यांमध्ये चढाओढ दिसून आली.

स्वच्छ भारताविषयी खेलो इंडियामध्ये जनजागृती

स्वच्छ भारत व पर्यावरण रक्षण याबाबत येथे माहिती दिली जात आहे. त्याची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. ठिकठिकाणी ओेला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. खाऊचा डबा खाल्यानंतर आपण बसलेली जागा स्वच्छ ठेवण्याबाबत या विद्याार्थ्यांमध्ये जाणीव दिसून आली.

स्पोर्टस् एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांसह पोलिसही सहभागी

अ‍ॅॅथलेटिक्स स्टेडियममागे उभारण्यात आलेल्या क्रीडा प्रदर्शनासही शालेय विद्याार्थी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. तेथे टेबल टेनिस, टेनिस, अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल आदी खेळांची कृत्रिम छोटी मैदाने उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे रोप क्लाईम्बिंगच्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांचाही शालेय विद्याार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. विशेषत: फुटबॉलमध्ये गोलात चेंडू मारण्यासाठी व अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर धाव घेण्याचा आनंद घेण्यात अनेक बालचमू रमत आहेत. त्याचबरोबर येथे विविध खेळांविषयी माहिती देण्यासाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. ज्येष्ठ आॅलिंपिकपदक विजेत्यांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. त्यालादेखील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंदोबस्तासाठी असलेले पोलिसही विद्यार्थ्यांना एक्स्पोमधून आणून स्वत: देखील सहभागी होत आहेत.

You might also like