पुणे । जलतरणात महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात दोनशे मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सोेनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर २ मिनिटे ४३,५४ सेकंदात पार केले. तिने चुरशीच्या शर्यतीत कल्याणी सक्सेना (गुजरात) व हर्षिता जयराम (कर्नाटक) यांच्यावर मात केली.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीत शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. ज्योती ही मुंबई येथील खेळाडू असून तिचे वडील बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. आजपर्यंत तिने शालेय व कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धांप्रमाणेच खुल्या राष्ट्रीय स्पर्धेतही भरपूर पदकांची कमाई केली आहे.
महाराष्ट्राला आणखी एक सुवर्णपदक करीना शांक्ता हिने २०० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत २ मिनिटे ४७.५५ सेकंदात जिंकली. तिचे हे या स्पधेर्तील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे. याआधी तिने १०० मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यत जिंकली होती.
महाराष्ट्राच्या आकांक्षा बुचडे हिने २१ वषार्खालील मुलींमध्ये १०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. तिने हे अंतर एक मिनिट ०८.४५ सेकंदात पार केले. राजस्थानच्या फिरदोश कयामखानी हिने ही शर्यत एक मिनिट ०७.१७ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. आकांक्षा ही विनय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. येथे तिने याआधी दोनशे मीटर्स बटरफ्लाय शर्यतीतही रौप्यपदक मिळविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी