fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेलो इंडिया: नेमबाजीत मेहुली घोष, अभिनव शॉ विजेते

पुणे। पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने दहा वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत दहा मीटर्स एअर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी ५०१.७ गुणांची नोंद केली.

तसेच महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात २५ मीटर पिस्तुल प्रकारात कास्यंपदक मिळविले. अभिज्ञाने २० गुण नोंदविले.

राजस्थानच्या दिव्यांश सिंग पन्वर व मानिनी कौशिक यांना रौप्यपदक मिळाले. त्यांनी ४९६.१ गुण मिळविले. मध्यप्रदेशच्या श्रेया अगरवाल व हर्षित बिंजवा यांनी ४३३.६ गुणांसह ब्राँझपदक पटकाविले.

अभिज्ञाला कास्यंपदक मिळालेल्या गटात दिल्लीची देवांशी राणा (२४ गुण) व हरयाणाची अंजली चौधरी (२३ गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले.

You might also like