Loading...

खेलो इंडिया युथ गेम्स: खो-खो मध्ये महाराष्ट्राची दिमाखदार सलामी

गुवाहटी। सुवर्णपदकांसाठी हुकमी खेळ मानल्या गेलेल्या खो-खो मध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राने एकतर्फी विजयासह दिमाखदार सलामी केली. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा १६-९ असा एक डाव ७ गुणांनी धुव्वा उडविला. १७ वर्षाखालील मुलांमध्ये आंध्रप्रदेशवर १६-५ असा दणदणीत विजय मिळविला.

Loading...

मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राकडून निहार दुबळे (अडीच मिनिटे व ३ गडी), प्रद्युम्न पाटील (२ मिनिटे व ४ गडी) व संकेत कदम (नाबाद २ मिनिटे व ३ गडी) यांनी महत्त्वाची कामगिरी केली. तामिळनाडूकडून जयेशकुमार याने दोन गडी बाद करीत एकाकी झुंज दिली.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या विजयात चंदू चावरे (२ मिनिटे ४० सेकंद व २ गडी), रामजी कश्यप (२ मिनिटे २५ सेकंद व २ गडी) व सौरव अहिर (एक मिनिट ३५ सेकंद व एक गडी) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला. आंध्रप्रदेशने दुसºया डावात साडेतीन मिनिटे झाल्यानंतर सामना सोडून दिला. त्यांच्याकडून के.कन्नन नायडू ( एक मिनिट २० सेकंद व एक मिनिट १० सेकंद) याचे प्रयत्न अपुरे ठरले.

मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने ओडिशाचा ९-७ असा एक डाव दोन गुणांनी पराभव केला. त्यामध्ये प्रियांका भोपी (साडे पाच मिनिटे) हिने पळतीचा खेळ केला. तर, काजल भोर हिने (दोन मिनिटे व २ गुण) असा अष्टपैलू खेळ केला. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने केरळचा १८-९ असा दणदणीत पराभव केला. त्यामध्ये दिक्षा सोमसूरकर हिने (दोन मिनिटे) पळतीचा खेळ केला. तसेच ६ गडी टिपले.

You might also like
Loading...