पुणे । महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे १७ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकून वर्चस्व गाजविले. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान १९-१७ असे परतविले. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर १९-८ असा दणदणीत विजय नोंदविला.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. भर उन्हातही भरपूर प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेला महाराष्ट्र व दिल्ली हा सामना विलक्षण रंगतदार झाला. महाराष्ट्राने पूर्वार्धात ७-५ अशी आघाडी घेतली होती, तथापि दिल्लीने पूर्ण वेळेत १२-१२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना अलाहिदा डावावर गेला.
या डावात महाराष्ट्राच्या जान्हवी पेठे हिने शेवटची दोन मिनिटे नाबाद पळती करीत संघास सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले. महाराष्ट्राकडून किरण शिंदे (पहिल्या डावात ३ मि. २० सेकंद), अश्विानी मोरे (पहिल्या डावात २ मि. दुसºया डावात २ मि. ५० सेकंद), जान्हवी पेठे (पहिल्या डावात १ मि. ४० सेकंद, दुसºया डावात १ मिनिट व अलाहिदा डावात नाबाद २ मिनिटे व एक गडी) यांनी उल्लेखनीय खेळ केला.
त्यांना कर्णधार दीक्षा सोनसूरकर (१ मि. १० सेकंद व ५ गडी), श्रुती शिंदे (साडेतीन मिनिटे व एक गडी) यांनी चांगली साथ दिली. दिल्ली संघाकडून शहनाझ (पहिल्या दोन डावात प्रत्येकी १ मि. ४० सेकंद, अलाहिदा डावात दीड मिनिटे तसेच २ गडी), मनूकुमारी (दुसºया डावात २ मि. , अलाहिदा डावात १ मि. ५० सेकंद), सोमिया व दिव्या (प्रत्येकी तीन गडी) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
संघास जिंकून देण्याचेच ध्येय : जान्हवी
अलाहिदा डावात शेवटची दोन मिनिटे पळती करण्याची माज्यावर जबाबदारी होती. मी जर लवकर बाद झाले तर आणखी एक गडी बाद होऊन सामना सडनडेथवर जाण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी मी माज्या शैलीने खेळत राहिले.
ती दोन मिनिटे माज्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वाटत होती असे सांगून जान्हवी म्हणाली, दुसºया डावात दिल्ली संघाचे आक्रमण चांगले झाले होते. हे लक्षात घेऊन मी शक्यतो त्यांच्या खेळाडूंकडून कशा चुका होतील यावर भर दिला.
जान्हवी ही मूळची सोलापूर जिल्ह््यातील मोहोळ तालुक्यामधील खंडोबाची वाडी येथील रहिवासी आहे. तिचे वडील बसवाहक आहेत. खो खो खेळासाठी ती उस्मानाबाद येथे राहते. तिने आतापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
खो खो महासंघाकडून बक्षीसांचा वर्षाव
खेलो इंडियात सहभागी झालेल्या खो खो खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी भारतीय खो खो महासंघाने १७ व २१ वषार्खालील मुले व मुली या चारही विभागात उपांत्य फेरीत स्थान मिळविलेल्या संघांमधील प्रत्येक खेळाडूला एका वषार्साठी प्रत्येकी बारा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
त्याखेरीज १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळविणाºया महाराष्ट्र संघास एक लाख रुपये तर उपविजेत्या दिल्ली संघास ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकांना २१ हजार रुपये तसेच जान्हवी पेठे हिला २१ हजार रुपयांचे बक्षीस दिले.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्रास आंध्रप्रदेशविरुद्ध १९-८ असा विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. पूर्वार्धात त्यांनी ९-४ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राकडून ह्रषिकेश शिंदे (नाबाद २ मि.४० सेकंद, १ मि. ४० सेकंद व ४ गडी), रोहन कोरे (अडीच मिनिटे व २ गडी), कर्णधार चंदू चावरे (२ मि. १० सेकंद व ३ गडी), दिलीप खांडवी (१ मि. ३ मि. १० सेकंद व २ गडी), आदित्य गणपुले (३ मि. १० सेकंद व १ गडी) यांनी कौतुकास्पद खेळ केला. पराभूत संघाच्या के.राम मोहन (२ मिनिटे), जे.नितीश (१ मि. २० सेकंंद व ४ गडी) यांनी एकाकी लढत दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन
–मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना
–टीम इंडिया विरुद्धच्या निर्णायक वनडेसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ