अन्य खेळटॉप बातम्या

KHO KHO WC; भारताने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भुटानला नमवलं, 71-34 ने दणदणीत विजय

खो खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने चौथ्या सामन्यात भुटानला 71-34 असे पराभूत केले. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारतीय महिला संघानंतर आता पुरुष संघानेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी, अटॅकरपासून ते डिफेंसरपर्यंत, उत्कृष्ट कामगिरी केली. प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मागील तीन सामन्यांप्रमाणेच चौथ्या आणि शेवटच्या सामन्यातही तीच लय कायम ठेवली. सामन्यादरम्यान भूतानला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने पहिल्या डावात अटॅक करताना 38 गुण मिळवले. पण डिफेंसमध्ये भुटानला चांगलेच झुंजवले. कारण या दुसऱ्या डावात भारताने फक्त 18 गुणच दिले. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताकडे 24 गुणांची आघाडी होती. तिसऱ्या डावात भारताने यात आणखी 38 गुणांची कमाई केली. त्यामुळे तिसऱ्या डावाअखेर भारताने 62 गुणांची आघाडी घेतली. चाैथ्या डावापूर्वीच सामना भारताच्या खिश्यात होता. कारण शेवटच्या सात मिनिटात 62 धावांची आघाडी मोडायची म्हणजेच भारताच्या 21 बॅच बाद करणं गरजेचे होतं. ते काही भुटानला शक्य झाले नाही. आखेरीस 28 मिनिटांचा खेळ संपला तेव्हा भारताने हा सामना 71-34 च्या फरकाने जिंकला.

भारतीय संघाचे सर्व साखळी फेरीचे सामने संपले आहेत. भारतीय संघ आता उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेविरुद्ध खेळेल. टीम इंडिया क्वार्टर फायनलमध्ये हा सामना जिंकून सेमीफायनलकडे वाटचाल करू इच्छिते. क्वार्टर फायनल सामना आज 17 जानेवारी रोजी खेळवला जाईल. भारतीय पुरुष संघ आता ट्रॉफी गाठण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. त्यांच्या अद्भुत कामगिरीकडे पाहता असे दिसते की त्यांना रोखणे कोणत्याही संघासाठी सोपे नसेल.

हेही वाचा-

महाराष्ट्रावर भारी विदर्भ! प्रथमच फायनलमध्ये एंट्री, या संघाशी होणार जेतेपदाचा सामना
4 शहरं, 5 टीम, 22 मॅच! महिला प्रीमियर लीग 2025 चे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्रात अंतिम सामना
आरसीबीचा ‘फ्लाइंग मॅन’! हवेत उडी मारून घेतला अद्भूत झेल; व्हायरल VIDEO पाहा

Related Articles