भारताचे दोन बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) इंडोनेशिया मास्टर्स २०२१ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवून या दोन्ही भारतीय बॅडमिंटनपटूंनी उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. यामध्ये पुरुषांच्या गटातील उपांत्यपूर्व सामन्यात दोन भारतीय खेळाडू एकमेकांसमोर होते, ज्यामध्ये किदांबी श्रीकांतने विजय मिळवला आहे.
उपांत्यपूर्व सामन्यात किदांबी श्रीकांत आणि एचएस प्रणॉस या दोन भारतीयांचा आमना सामना झाला. यामध्ये श्रीकांतने प्रणॉयला २१-७, २१-१८ अशा फरकाने मात दिली आणि उपांत्य सामन्यात धडक मारली. या सामन्यात प्रणॉयने सुरुवातीला आक्रमक रूप धारण केले होते आणि ५-२ अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतर श्रीकांतने एका पाठोपाठ एक चांगले शॉट खेळले आणि सामन्यात पुनरागमन करून विजय मिळवला.
यापूर्वी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीला पराभूत केले होते. क्रिस्टीसोबतचा सामना एक तास आणि दोन मिनिट चालला होता, श्रीकांतने यामध्ये १३-२१, २१-१८,२१-१५ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व सामन्यात स्थान पक्के केले होते. तसेच प्रणॉयने उपांत्यपूर्व सामन्यात जागा बनवण्यासाठी टोकियो ऑलिम्पिक सुपर्ण पदक विजेता विक्टर एक्सेलसेन याला पराभूत केले होते.
महिलांच्या गटात पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व सामना जिंकण्यासाठी तुर्कीच्या नेसलिहान यिगित हिला पारभूत केले. सध्याची विश्वविजेता खेळाडू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने नसलिहान यिगित हिचा २१-१३, २१-१० अशा फरकाने पराभव केला. यानंतर पीव्ही सिंधू आता उपांत्य सामना खेळणार आहे.
यापूर्वी गुरुवारी सिंधूचा सामना स्पेनच्या क्लारा आजुरमेंडी सोबत झाला होता. सिंधूने या सामन्यात क्लाराचा पराभव केला होता आणि उपांत्यपूर्व सामन्यात स्वतःचे स्थान पक्के केले होते. आता जपानच्या अकाने यामागुची आणि थायलंडच्या पार्नपावी चौचुवोंग यांच्यात होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जो खेळाडू जिंकेल, त्याच्यासोबत सिंधू उपांत्य सामन्यात भिडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितचा ‘हिट’ विक्रम! गेल, आफ्रिदीनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच क्रिकेटपटू
‘चुका करतो आणि शिकतो’, पदार्पणाच्या सामन्यातच ‘सामनावीर’ ठरलेल्या हर्षल पटेलची प्रतिक्रिया