श्रीलंकेचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन्ही संघात ३ सामन्यांची टी२० मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (०४ मार्च) अँटिगा येथे पार पडला आहे. यजमान संघाने ४ विकेट्सने पाहुण्यांना चितपच करत मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. दरम्यान वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड याने आतिशी फटकेबाजी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलार्डने श्रीलंकाचा गोलंदाज अकीला धनंजय याची चांगलीच धुलाई केली. डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या धनंजयच्या गोलंदाजीवर त्याने एकामागोमाग एक सलग ६ षटकार मारले. अशाप्रकारे एकाच षटकात पोलार्डने ३६ धावा चोपल्या.
यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा तो तिसरा आणि वेस्ट इंडिजचा पहिला फलंदाज ठरला आहे. पोलार्डपुर्वी माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आणि दक्षिण आफ्रिकन दिग्गज हर्शल गिब्ज यांनी हा मानाचा विक्रम केला होता.
युवराजने १९ सप्टेंबर २००७ रोजी इंग्लंडविरुद्ध टी२० विश्वचषक सामन्यात हा पराक्रम केला होता. तो वेगवान गोलंदजा स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार मारत हा करिश्मा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. तर गिब्जने नेदरलॅंडविरुद्ध वनडे विश्वचषकात फिरकीपटू डान वेग बंगच्या षटकात ६ षटकार ठोकले होते.
Absolute scenes 🤯@KieronPollard55 becomes the first @windiescricket player to hit six straight sixes in a T20I!#WIvSL pic.twitter.com/nrtmJHGcip
— ICC (@ICC) March 4, 2021
Take a bow Skipper!🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 The 1st West Indian to hit 6️⃣ sixes in an over in a T20I!🤯 #WIvSL #MenInMaroon
Live Scorecard⬇️ https://t.co/MBDOV534qQ pic.twitter.com/etkxX7l7bq
— Windies Cricket (@windiescricket) March 4, 2021
लक्षवेधी बाब अशी की, पोलार्डने धनंजयच्या ज्या षटकात सलग ६ षटकार खेचले, त्यापुर्वीच्या षटकात धनंजयने हॅट्ट्रिक घेतली होती. डावातील चौथ्या षटकात त्याने एविन लेविस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरनला सलग बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
वातावरण बदलाचा पाहुण्यांना धक्का; इंग्लंड संघाच्या कोचसह खेळाडूंच्या प्रकृतीत बिघाड
कुलदीप यादवला दुर्लक्षित का केलं जात? कॅप्टन कोहलीने दिले उत्तर