मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 20 ऑगस्टनंतर सर्व संघ यूएईला रवाना होतील. यावेळी कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा भारतीय मैदानावर होणार नाही. आयपीएलची ट्रॉफी जिंकणे हे सर्व संघांचे समान उद्दीष्ट असणार आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचेही हेच लक्ष्य आहे. यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाब फ्रँचायझीदेखील आशावादी आहे. कारण त्यांच्याकडे मदतीसाठी खूप गुणवान कर्णधार केएल राहुल आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आहेत. कर्नाटकची ही जोडी आयपीएलमध्ये चमत्कार करू शकते.
केएल राहुल आणि अनिल कुंबळे यांनीही किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथमच आयपीएल जिंकून देण्यासाठी कठोर परिश्रम सुरू केले आहेत. सोमवारी केएल राहुलने सोशल मीडियावर त्याच्या ट्रेनिंगचे फोटो पोस्ट केले असून त्यामध्ये तो जोरदार सराव करताना दिसत आहे.
राहुल फलंदाजीचा सराव करीत होता आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे त्याच्या फलंदाजीवर लक्ष देत होते. एवढेच नव्हे, तर राहुलने यष्टीरक्षणाचा सरावदेखील केला. राहुल आता भारतीय संघात यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. आयपीएलमध्येही तो पंजाब संघाचे नेतृत्व करण्यासोबतच यष्टीरक्षणाची जबाबदारी देखील सांभाळणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त अनिल कुंबळे यांनाही आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. कुंबळे यांनी सन 2011 पर्यंत आयपीएल खेळले आहे. त्यांनी 42 सामन्यात 45 विकेट्स घेतले आहेत. एवढेच नव्हे तर ते बंगळुरू आणि मुंबईचे मुख्य मार्गदर्शकही होते. अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2015 मध्ये मुंबईनेही आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्यामुळे यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाब संघालाही अशीच आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सगळे प्रयत्न करुन झाले! पहा अखेर शोएब- सानिया भेटले की नाही?
-इतिहास घडला! इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने दहाव्या क्रमांकावर खेळताना ठोकले तुफानी शतक
-माजी अष्टपैलूची गोलंदाजांना चेतावणी! म्हणतो, आयपीएलमध्ये धोनीपासून…
ट्रेंडिंग लेख-
-विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 12 वर्षे पूर्ण…
-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणारे ३ भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल २०२०: आरसीबीसाठी असे असू शकतात सलामी जोडीचे ३ पर्याय