भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. विराट फक्त क्रिकेटमधूनच कमाई करत नाही, तर त्याच्या कमाईचे अनेक मार्ग आहेत. तो अनेक ब्रँड्समधून पैसा कमावतो. विराटहा भारतीय संघाचा अ+ श्रेणीतील खेळाडू आहे. तसेच, तो आयपीएलपासून ते ब्रँड्सच्या प्रचारापर्यंत कोट्यवधी रुपये आकारतो. त्याचे एक घड्याळदेखील महागड्या गाडीच्या किंमतीपेक्षा जास्त महाग आहे. चला तर, त्याच्या संपत्तीविषयी जाणून घेऊयात…
माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट कोहली (Virat Kohli) याची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये आहे. विराटला बीसीसीआयकडून वर्षाकाठी 7 कोटी रुपये मिळतात. विराटच्या कमाईचा मार्ग एकच नाही, तर अनेक मार्गांनी तो कोट्यवधी रुपये कमावतो. विराट ब्रँड एंडॉर्समेंट आणि स्टार्टअप्समधून क्रिकेटपेक्षा 4 पटीने पैसा कमावतो.
एका रिपोर्टनुसार, विराटला एका सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. तसेच, वनडे क्रिकेटविषयी बोलायचं झालं, तर त्यासाठी त्याला 6 लाख रुपये मिळतात. याव्यतिरिक्त टी20 क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी त्याला 3 लाख रुपये मिळतात.
याव्यतिरिक्त आयपीएलविषयी बोलायचं झालं, तर त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून वर्षाकाठी 15 कोटी रुपये मिळतात. ब्रँड एंडॉर्समेंटमधून किंग कोहली तब्बल 175 कोटी रुपये कमावतो. तसेच, तो एका जाहिरातीसाठी दिवसाचे 7.50 ते 10 कोटी रुपये कमावतो. एवढंच नाही, तर विराट एका प्रमोशन पोस्टसाठी इंस्टाग्रामवरून जवळपास 8 कोटींहून अधिक रुपये कमावतो.
लाखोंचं घड्याळ
जशी कमाई, तसा खर्च असे म्हणतात, हे विराटलाही लागू होते. विराटच्या घड्याळाविषयी बोलायचं झालं, तर त्याच्याकडे रोलेक्स डेटोना रेनबो ऍव्हरेज गोल्ड नावाचे घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत 69 लाख ते 87 लाख रुपये आहे. एका ऑडी कारच्या किंमतीचे घड्याळ विराट आपल्या हातात घालतो. एका लग्झरी ऑडी A4 या कारची किंमत 43 लाखांपासून सुरू होते.
याव्यतिरिक्त विराटकडे 110 कोटींहून अधिक रुपयांची प्रॉपर्टीही आहे, ज्यात घरांचा समावेश आहे. विराटकडे मुंबईच्या वरळी भागात लग्झरी अपार्टमेंट आहे. तिथे विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका यांच्यासोबत राहतो. या अपार्टमेंटची किंमत 34 कोटी रुपये आहे. तसेच, विराटकडे गुडगाव येथे 80 कोटी किंमतीचे घरदेखील आहे.
विराट कोहलीने 7 स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. या स्टार्ट-अपमध्ये ब्लू ट्राईब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्वो यांचा समावेश आहे. या सर्व स्टार्ट-अपमध्ये विराटने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त विराटने स्वत:च्या पाच स्टार्ट-अप कंपन्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये वन-2 रेस्टॉरंट, न्यूएवा डायनिंग बार आणि रेस्टॉरंट, वन-8, स्टेपथलोन यांचाही समावेश आहे. (king virat kohli owned most expensive things including watch and this things know here)
महत्वाच्या बातम्या-
‘आता रणजी खेळणं बंद कर…’, विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांकडून सरफराजकडे दुर्लक्ष, संतापले गावसकर
बटलर नावाचं वादळ इंग्लंडमध्ये घोंगावलं! बनला टी20 क्रिकेटमध्ये ‘असा’ भीमपराक्रम करणारा जगातील नववा खेळाडू