fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केएल राहुलचा कर्णधार म्हणून पहिला निर्णय क्षेत्ररक्षणाचा, या धुरंदरला केले बाहेर

Kings XI Punjab Won The Toss Against Delhi Capitals And Opted To Field First

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


कट्टर विरोधक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने काल (१९ सप्टेंबर) आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात झाली. आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये या हंगामातील दूसरा आयपीएल सामना खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या संघांमध्ये हा सामना होणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना खेळला जात आहे. तत्पुर्वी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. Kings XI Punjab Won The Toss Against Delhi Capitals And Opted To Field First

आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलने विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. तर २० वर्षीय युवा भारतीय फिरकीपटू रवि बिश्नोई पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. हा बिश्नोईचा आयपीएल पदार्पणाचा आहे. त्याच्याव्यतिरिक्त कृष्णप्पा गौतम या फिरकीपटूलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

तर दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या सामन्यात खेळताना दिसणार नाही. सरावादम्यान त्याला दुखापत झाल्यामुळे तो सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्माला स्थान देण्यात आले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकाचा ऍनरिच नॉर्ट्जे हादेखील वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसेल.

असे असले तरी, आयपीएल २०२० लिलावात संघात निवडण्यात आलेल्या अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही, तर फिरकीपटू अमित मिश्राही पहिल्या सामन्यात दिल्ली संघाचा भाग नाही.

असा आहे किंग्स इलेव्हन पंजाब संघ-

केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, करुन नायर, निकोलस पूरन, सरफराज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, कृष्षप्पा गौतम, क्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल, मोहम्मद शमी आणि रवि बिश्नोई

असा आहे दिल्ली कॅपिटल्स संघ-

शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्क स्टोअनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, ऍनरिच नॉर्ट्जे आणि मोहित शर्मा

महत्त्वाच्या बातम्या-

-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे सामन्यात पडला फरक; सेहवागने दिली प्रतिक्रिया

-एकतर षटकार मारेन किंवा बाद होईल ही मानसिकता घेऊनच खेळलो; पहा कोण म्हणतंय

-‘या’ संघाच्या कर्णधाराला हवंय खास गिफ्ट, जे बनवेल त्याचा आयपीएल हंगाम खास

ट्रेंडिंग लेख-

-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान

-कहर धोनीचा! पहिल्याच आयपीएल सामन्यात नावावर केले एक-दोन नव्हे तर ३ किर्तीमान

-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा


Previous Post

‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे सामन्यात पडला फरक; सेहवागने दिली प्रतिक्रिया

Next Post

आयपीएलमध्ये विक्रम अनेक झाले, परंतू नकोसा विक्रम मात्र आजही पुण्याच्या नावावर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Facebook/ ICCPune Warriors India - Official

आयपीएलमध्ये विक्रम अनेक झाले, परंतू नकोसा विक्रम मात्र आजही पुण्याच्या नावावर

Photo Courtesy: Twitter/IPL

स्वप्नातही कुणी विचार केला नसेल असा खराब विक्रम आहे शमीच्या नावावर

Photo Courtesy: Twitter/IPL

पहिल्या सामन्यातील 'किंग' समजल्या जाणाऱ्या खेळाडूला पंजाबने दाखवला बाहेरचा रस्ता

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.