भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला पहिल्यांदा 2004 साली भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याने बांगलादेशविरुद्ध आपला पदार्पणाचा सामना खेळला होता. परंतु भारतीय संघात त्याची निवड सहज झाली नव्हती. नुकतेच काही दिवसांपूर्वी माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता की, कोणत्या परिस्थितीत धोनीची भारतीय संघात निवड झाली होती.
भारतीय संघात आल्यावर धोनीने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याबरोबर त्याने आयसीसीचे तीन चषक मिळवून दिले. त्यात 2007 चा टी20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.
सन 2004 साली निवड समितीचे प्रमुख किरण मोरे यांनी त्या परिस्थितीचा खुलासा केला आहे. जेव्हा धोनीची बांगलादेश संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. ही ती वेळ होती, जेव्हा भारतीय संघ लगातार यष्टीरक्षक बदलत होता. वनडेत भारतीय संघाचा यष्टीरक्षक राहुल द्रविड होता आणि तो चांगली कामगिरी करत होता. त्याने 73 वनडे सामन्यात 71 झेल आणि 13 यष्टीचीत केले होते.
परंतू, निवड समितीला वाटत होते की राहुल द्रविडवर अतिरिक्तभार आहे आणि त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. अर्थात पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक ही जवळपास होते. मात्र, निवड समितीला असा खेळाडू हवा होता जो चेंडूला योग्य प्रकारे हिट करू शकेल आणि यष्टीच्या मागे सुद्धा जबाबदारी पार पाडेल.
किरण मोरे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक डब्ल्यूवी रमण यांच्या पाॅडकास्ट इनसाइड आउटमध्ये म्हणाले, “राहुल द्रविडने 75 वनडे सामन्यात ही भूमिका पार पाडली होती. आम्हाला राहुलला आराम द्यायचा होता. यादरम्यान धोनी भारतीय अ संघाकडून चांगली फलंदाजी करत होता.”
किरण मोरे पुढे म्हणाले, “केनियात खेळताना धोनी वेगळा जाणवला, ज्या प्रकारे तो संघाला पुढे घेवून जात होता. त्या दौर्यावर धोनीने 600 धावा केल्या. आमच्याजवळ युवराज सिंगसारखे खेळाडू पहिल्यापासून होते. धोनी आला, तो पूर्ण पॅकेज होता, आणि त्याने भारतीय संघात वादळ निर्माण केले.”
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात